पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घेऊन, दि ग्राउंडनट प्रोसेसर्स को. ऑ. सोसायटी १९६० मध्ये काढली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी तेलगिरण्या काढल्या. अशा प्रकारे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दादानी विधायक, समाजोपयोगी कामात स्वतःला अक्षरशः गाडून घेतले होते. साखर कारखान्याची संपूर्ण यंत्रणा आजूबाजूच्या भागाच्या विकासासाठी कशी राबविता येईल याचा ते अहर्निश विचार करत. निदान आपल्या सांगली जिल्ह्यात तरी नावापुरता सुद्धा बेकार माणूस राहू नये ही त्यांची मनापासूनची अिच्छा होती. विधायक कामे करता करता दादांनी शैक्षणिक कामाकडेही लक्ष पुरवले. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे ते चेअरमन होते. त्या संस्थेमार्फत कॉलेज काढण्यात, तसेच मिरज येथे मेडिकल कॉलेज काढण्यात, त्यानी महत्त्वाचा वाटा उचलला. सांगलीच्या परिसरातील सांस्कृतिक शक्ती लक्षात घेऊन, १९६३ साली सांगलीला आकाशवाणी केंद्र मिळवून देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. सांगलीच्या वाढत्या आरोग्यविषयक समस्या आणि जिल्ह्यातील गरीब जनतेच्या वैद्यकीय गरजा भागवण्याच्या दृष्टीकोनातून १९६३ साली, प्रशस्त सिव्हिल हॉस्पिटल अभारण्यात त्यानी पुढाकार घेतला. वसंतदादांचे राजकीय कर्तृत्व मात्र यशदायी झालं नाही. दादांची विधायक कार्यकुशलता जशी सर्वसान्य झाली तशी त्यांची राजकीय कामगिरी झाली नाही. अलट अनेक प्रसंगात ती वादग्रस्तच ठरली. काँग्रेस पक्षावर त्यांची अनन्यसाधारण निष्ठा होती “आमच्यातून काँग्रेस वजा केली तर सार्वजनिक जीवनात आम्ही शून्य आहोत” अशी त्यांची धारणा होती. १९३७ सालापासून दादानी गावकाँग्रेस पासून आपल्या राजकीय अमेदवारीची सुरुवात केली. नंतर तालुका काँग्रेस, जिल्हा कॉंग्रेस, अशा चढत्या श्रेणीने एकेक जबाबदाऱ्या पार पाडत, ते राज्यस्तरावर आले. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या असीम कर्तृत्वामुळे ते सर्वांच्या आदरास पात्र झाले होतेच. त्यांच्या संघटना - कौशल्यामुळे, गोड वागणुकीमुळे आणि सर्वाना बरोबर घेऊन जाण्याच्या वृत्तीमुळे, प्रथम महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे सेक्रेटरीपद, नंतर अपाध्यक्षपद अशी वाटचाल करत करत, १९६६ मध्ये दादा प्रदेशाध्यक्ष झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर होमगार्ड कमांडंट म्हणून त्यानी लक्षवेधक कार्य केले. पूर्वीचे भूमिगत कार्यकर्ते स्वातंत्र्यानंतर तशीच पुंडाई करत होते. परकीय सरकार विरुद्ध दाखवलेली मर्दुमकी आपल्याच सरकारपुढे दाखवण्यात शहाणपणा नव्हता आणि ती दादागिरी आपल्याच जनतेवर करण्यात शुद्ध वेडेपणा सांगली आणि सांगलीकर.. २१८