पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाहणी करुन आले. साखर कारखान्याजवळच्या माळरानावरची जागा निश्चित करण्यात आली. १३५ एकर जागा मिळवून जमिनीची मोजणी करुन प्लॉट्स पाडण्यात आले. सर्वानीच सहकाराचे, अत्साहाचे वातावरण ठेवल्याने ऑक्टोबर १९६० मध्ये औद्योगिक सोसायटी कार्यान्वित झाली. भराभर शेड्स बांधण्यात आल्या. फॉन्ड्री, फोर्जिंग, सिमेंट वस्तू, लेदर गुड्स, काटेरी तार, रीरोलिंग मिल, ऑप्टिकल बंकेट पेपरमिल, फॅब्रिकेशन अशा विविध प्रकारांचे कारखाने, औद्योगिक वसाहतीमध्ये सुरु झाले. . यामुळे शेतीप्रधान कारखानदारीची वाढ होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले. जिल्ह्यातील अपलब्ध साधनसंपत्तीचा उपयोग विकासासाठी तर झालाच; शिवाय अनेक कारागिराना काम मिळाले. वसाहतीमधील कारखानदारांना कच्चा माल योग्य दरात मिळवून देण्यात, औद्योगिक सोसायटीने पुढाकार घेतला. स्थानिक तरुणांना तांत्रिक शिक्षणाची सोय व्हावी म्हणून वसंतदादांनी इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरु करण्यात पुढाकार घेतला; त्यामुळे कुशल कामगार तयार झाले. महाराष्ट्रात पाऊस कमी पण नद्याना पाणी भरपूर असूनही त्याचा अपयोग शेतीसाठी म्हणावा तसा करुन घेतला जात नव्हता. सरकारी माध्यमांच्या सहकार्याने वसंतदादानी, सांगली जिल्ह्यात पद्माळे, कसबे डिग्रज, आदी भागात नदीच्या पाण्यावर पंप बसवून, शेतीस पाणी पुरवठा करण्याच्या योजना, सहकारी तत्त्वावर सुरु करण्यात पुढाकार घेतला. साखर कारखान्यामार्फत या योजना राबवण्याच्या दृष्टिकोनातून गावोगाव सभा घेऊन, अशा योजनेचे फायदे त्यानी शेतकऱ्यांना समजावून सांगितले. यामुळे शेतकऱ्यांच्या हजारो एकर जिराइती जमिनी पाण्याखाली आल्या. पाण्याचा पुरवठा सातत्याने राहिल्याने, वर्षातून दुबार पिके घेणे शक्य झाले. साखर कारखान्यासाठी हमखास अस मिळण्याची सोय झाली. १९५९-६० च्या सुमारास सांगली जिल्ह्यात सुमारे २५ लाख एकर जमिनीवर शेंगेचे अत्पादन होत असे. शेंग पिकवणारा जिराईत शेतकरी नेहमी निसर्गावर अवलंबून असे. त्यामुळे अत्पन्नाची अनिश्चितता असे. पुन्हा शेंग खरेदी-विक्री करणाऱ्या दलालांकडूनहि त्याची फसवणूक होत असे. हे टाळून शेतकऱ्यांना फायदा करुन द्यावा, या हेतूने शेंगपिकाचा प्रक्रियात्मक कृषिअद्योग सुरु केल्यास शेतकऱ्याचा फायदा होईल. असा दादानी विचार केला. शेंगेपासून तेल, पेंड, तेलावर प्रक्रिया करुन रिफाइन्ड तेल, वनस्पती तूप, पेंडीतील तेलाचा अंश काढून नैट्रोजनयुक्त खत, कॅटल व पोल्ट्रीसाठी पेंड मिळण्यासारखी होती. त्यासाठी तेल गिरण्या, साबण रिफायनरी, वनस्पती प्लॅट, कॅटल फीड कारखाना, वगैरे शेंगेवरील प्रक्रियात्मक अद्योग अभे करण्याचे ठरले. दादानी चीफ प्रमोटर म्हणून पुढाकार कारखाना, सांगली आणि सांगलीकर... ..२१७