पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तो होता; अशा मंडळींना आणि पिढिजात गुंडांना आवरण्याचे काम करण्यात दादांचे संघटना-कौशल्य प्रगट झाले. संयुक्त महाराष्ट्राचा लढा पुऱ्या जोमात होता. द्वैभाषिक राबवणे दादानाहि मनापासून मान्य नव्हते. पण एक निष्ठावंत पक्षकार्यकर्ता म्हणून अन्याय त्यानी निमूटपणे सहन केला. लोकक्षोभ असतानासुद्धा पुष्कळ अंशी स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर काँग्रेसचे अमेदवार १९५७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यानी यशस्वी केले. सांगली मतदार संघातून ते स्वतः १९५२ च्या निवडणुकीपासूनच प्रचंड मताधिक्याने निवडून येत होते. दादा ही एक मोठी शक्ती आहे याची दिल्लीकराना यथार्थ जाणीव झाली होती. म्हणूनच १९७२ मध्ये स्वतः इंदिरा गांधीनी, वसंतदादा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पाहिजेत असा आग्रह धरल्याने, पाटबंधारे व वीज मंत्री म्हणून प्रथमच दादानी मंत्रीपद भूषवले. १९७६ पर्यंत त्यानी मंत्रीपद भूषवले. १९७६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यानी मंत्रिमंडळाची पुनर्रचना करताना वसंतदादाना अचानक वगळले. सर्व महाराष्ट्रभर या घटनेचे पडसाद अमटले. त्यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्याला अशी अपमानास्पद वर्तणूक देण्यात चूक झाली असे सर्वसामान्यपणे मानले जात होते. वसंतदादानी स्वतः ही गोष्ट फार मनाला लावून घेतली आणि एक प्रकारच्या अद्वेगापोटी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली. इथून त्यांचे अखेरीपर्यंतचे जीवन हे राजकारणाच्या लहरीनुसार वाहावत गेले. 'बेरजेचे राजकारण' करता करता सर्वत्र 'बेरक्यांचे' राजकारण सुरु झाले. राजकारण वारांगनेपेक्षाहि चंचल बनले. खुद्द त्यांच्या लाडक्या काँग्रेस पक्षात फाटाफुटी, गटबाज्यांना ऊत आला. आमदारांची शक्ती ज्याच्यामागे तो नेता. मग त्याला जनमानसात आदराचे स्थान असो वा नसो. आमदारांची पुरेशी संख्या पाठीशी असली की मुख्यमंत्री, ती संख्या कुणी पाठीत खंजीर घालून घटवली की खुर्चीीं खाली, असा असभ्य प्रकार, इतर प्रांतांप्रमाणेच महाराष्ट्रातही चालू झाला. या प्रकारात वसंतदादा १९७६ ते १९८५ या कालावधीत एकूण चार वेळा मुख्यमंत्री झाले पण दुर्दैवाने एकाहि वेळेला त्याना सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपद भोगणे राहू द्याच पण चारी वेळेला एकत्र मिळूनसुद्धा चार वर्षे काही मुख्यमंत्रीपद लाभले नाही. प्रत्येक खेपेला कधी वर्ष-दीड वर्ष तर कधी फक्त चार-पाच महिने. या प्रकारात त्यांचे अनेक सहकारी कधी दुरावले तर कधी जवळ आले. पण सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या ‘यशवंत-वसंत’ जोडीने अभ्या महाराष्ट्राचा कायापालट केला, तीच जमलेली जोडी एकमेकाना दुरावली ! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते कितीसे यशस्वी झाले हा एक चर्चेचा विषय होऊ शकतो. चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवण्याच्या काळात त्याना सरकारी नोकरांचा सांगली आणि सांगलीकर.. ..२१९