पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बरकत येईल. त्यानी खटपट करुन साखर कारखाना अभारणीसाठी, आवश्यक परवानगी सरकारकडून मिळविली. पुरेसा अस नसला तरी कारखाना कार्यान्वित होईपर्यंत, भरपूर अस अपलब्ध करु, अशी खात्री त्यानी सरकारला दिली. मात्र भाग भांडवल गोळा करताना, आणि अस लागवडीसाठी शेतकऱ्यांची मने वळवताना, वसंतदादांची अक्षरशः दमछाक झाली. ते आत्मविश्वासाने साखर कारखान्याची योजना त्याना समजावून सांगत. असाची लागवड केल्याने शेतकऱ्याला भरभराटीचे दिवस येतील याची खात्री देत. मार्केट कमिटीच्या यशामुळे दादांविषयी सर्वांच्या मनात एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला होता. त्यामुळे बिचकत बिचकत का होईना, पण शेतकऱ्यांनी साखर कारखान्याचे शेअर्स घ्यायला सुरुवात केली. ज्यांची शेअर्स घ्यायची अिच्छा आहे पण पैसा नाही अशा शेतकऱ्याना, वसंतदादानी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज मिळवून दिले. १३ लाख रुपयांचे भाग भांडवल गोळा झाले. सरकारने आपला दहा लाखाचा वाटा अचलला. इंडस्ट्रिअल फायनान्स कॉर्पोरेशनने ५५ लाखाचे कर्ज मंजूर केले. बराच विचार-विनिमय होऊन, संचालक मंडळाने सांगली-माधवनगर रस्त्यावरील ९० एकर जागा खरेदी केली. जर्मनीहून मशिनरी आणण्यात आली. तीन-चार वर्षांच्या घोर तपश्चर्येनंतर, १९५८ साली पहिला गळीत हंगाम सुरु झाला. कारखान्यासाठी घेतलेल्या जमिनीपैकी, ५० एकर जमिनीवर अस लागवड करण्यात आली होती. वस्तुतः कारखान्याचे रजिस्ट्रेशन मिळाल्यापासून ३९ महिन्याचा कालावधी, पहिला गळीत हंगाम सुरु करण्यासाठी मंजूर असतो. पण प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन दादांनी, आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने, अवघ्या २४ महिन्यातच गळीत हंगाम सुरु करुन दाखवला! हे मोठेच सुयश होते. सहकारी साखर कारखाना क्षेत्रातील हा एक चमत्कार होता. आज मोठा प्रगत कारखाना म्हणून या कारखान्याची गणना होते. या कारखान्याने या भागाचा कायापालटच केला. त्यामुळे बरेच अपधंदे सुरु झाले. अनेक लोक कामाला लागले. सायकल परवडत नसणारा शेतकरी बुलेट घेऊन धावू लागला ! १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर नामदार यशवंतरावानी पुणे-मुंबई सोडून, अितर भागात अद्योगधंद्याची वाढ व्हावी, प्रादेशिक असमतोल दूर व्हावा या हेतूने सर्वाना प्रोत्साहित केले. त्यांचा अजवा हात असणारे आणि प्रगतिशील विचारांचे वसंतदादा मागे कसे पडणार ? साखर कारखान्याच्या पाठोपाठ पूरक अद्योग व लहान अद्योग सुरु केल्यास स्थानिक कामगारांना रोजगार अपलब्ध होणार होता. दादानी चीफ प्रमोटर म्हणून पुढाकार घेऊन औद्योगिक सहकारी सोसायटी स्थापन केली. दादा सांगलीतील काही कारखानदारांना घेऊन पंजाबातील अद्योगधंद्याची सांगली आणि सांगलीकर.. २१६