पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होता. या खेपेला पण व्यापाऱ्यांचा विरोध होताच. एक तर सांगलीत शेतव्यापारासाठी स्वतंत्र वखारभाग असल्याने, व्यापाऱ्यांना वेगळे अधिकृत मार्केटयार्ड नको होते. त्याहिपेक्षा या मार्केटयार्डामुळे काहीजणांच्या गैरवाजवी नफ्यास बाधा येणार होती; त्यांचा अनियंत्रित, अनिर्बंध, हक्क संपुष्टात येणार होता हे त्यांचे खरे दुखणे होते. अपेक्षेप्रमाणे त्यानी जोरदार विरोध केला. कोर्ट-कचेऱ्या केल्या. पण हायकोर्टाचा निर्णय त्यांचेविरुद्ध गेला. सांगलीच्या पूर्वेस १०० एकर जमिनीवर, व्यवस्थित प्लॉटस् पाडून, वसंतदादानी मार्केट यार्ड वसवले होते. त्यांच्या मनाचा मोठेपणा हा की जरी ते कायदेशीर लढाई जिंकले होते, तरी आपुलकीच्या आणि माणुसकीच्या भावनेतून, आपणहून व्यापाऱ्यांकडे गेले. त्यांच्याशी मोकळेपणाने बोलून त्यानी त्यांचे गैरसमज दूर केले. त्यांची मने जिंकली. १९५१ मध्ये मार्केट कमिटी स्थापन झाल्यापासून दादा चेअरमन म्हणून काम करत होते. तीन-चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर १९५५ च्या गुढी पाडव्याच्या सुमुहूर्तावर प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. सांगलीला सुनियंत्रित बाजारपेठ व्हावी म्हणून सरकारदरबारी खटपट करण्यापासून, तो जागा मिळवून तेथे व्यापाऱ्याना गोडीने आणवून, प्रत्यक्ष व्यवहार सुरु करण्यापर्यंतच्या अनेक खटाटोपी दादानी स्वतः केल्या. शेतकऱ्याना, त्यांच्या मनासारखा बाजारभाव त्यांच्या शेतमालास मिळू लागला. व्यापारी, दलाल व शेतकरी यांच्यामधील सर्व व्यवहारांवर, मार्केट कमिटीचे नियंत्रण असल्याने, शेतकऱ्यांची फसवणूक थांबली. त्यांचा फायदा होऊ लागला. सर्व शेतकरी मंडळी दादाना दुवा देऊ लागली. सुरुवातीला ३००० रु. कर्ज काढून सुरु केलेली ही मार्केट कमिटी, आज घडीला कोट्यावधी रुपयांचा व्यवहार करत आहे. महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना, डॉ. धनंजयराव गाडगीळ आणि पद्मश्री विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे १९४८-४९ मध्ये प्रवरानगर येथे सुरु झाला. १९५२ मध्ये साखरेवरील नियंत्रणे अठल्यावर साखरेची मागणी भरमसाट वाढली. साखर आयात करण्यात मौल्यवान परकी चलन खर्ची पडू लागले. त्यामुळे देशांतर्गत साखरेचे अत्पादन वाढवणे गरजेचे होते. महाराष्ट्रात असलागवडीच्या क्षेत्रात सहकारी साखर कारखाने अभे राहू लागले. आजूबाजूला सातारा - कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखाने निघाले. तेव्हा वसंतदादाना चैन पडेना. पण या भागात साखर कारखान्याची कल्पनाच अव्यवहार्य समजली जात असे. एकतर सांगली जिल्हा तसा कोरडवाहू शेतीचा जिल्हा होता. म्हैसाळ भागात थोडी फार असशेती होती, ती अगार कारखान्याला अपयोगी पडे. भिलवडी भागात पिकणारा अस गूळ अत्पादनात खर्ची पडे. पण दादाना फार वाटे की साखर कारखान्यामुळे या भागातील शेतकऱ्याला चांगली सांगली आणि सांगलीकर.. ..२१५