पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राजेसाहेबानी लोकमताची कदर करुन वसंतदादांची, २५ एप्रिल १९४६ रोजी, पूर्ण शिक्षा संपण्यापूर्वीच सुटका केली. वनवासाहून परतणाऱ्या प्रभू रामचंद्रासारखे अत्स्फूर्त आणि अभूतपूर्व असे दादांचे स्वागत, सांगलीच्या जनतेने केले. हजारोंच्या जनसमुदायाने रथातून त्यांची मिरवणूक काढली. जागोजागी त्यांचे संत्कार होऊ लागले. स्वातंत्र्यप्राप्ती झाली. वसंतदादांच्या बाबतीत कौतुकाची बाब ही की स्वातंत्र्यपूर्व काळातील वर्तणूक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील वर्तणूक, यामध्ये त्यानी जाणिवपूर्वक, स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणले. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा दहशतवाद, बंदुकीचा वापर ही एक अपरिहार्य बाब होती. पण आता आपली सारी ताकद, शक्ती, विधायक कामांसाठी वापरणे ही काळाची गरज होती. वसंतदादांचे मोठेपण याच वस्तुस्थितीत की ती परिवर्तनाची गरज त्यानी वेळीच ओळखली ! तत्कालीन सातारा जिल्ह्यातील गुंडगिरी कमी करण्यासाठी त्यानी प्रयत्न केले; क्रांतिकारक मार्गाने जाणाऱ्यानी पूर्वीचा मार्ग विसरावा, यासाठी त्यानी त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मनापासून प्रयत्न केला. पण पूर्णपणाने तो यशस्वी झाला नाही. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास घडवून आणण्याचा वसंतदादानी आता निश्चय केला. त्यांच्या विधायक कामांचा थोडक्यात आढावा असा घेता येईल, १९४९ मध्ये सातारा जिल्ह्याचे विभाजन, अत्तर सातारा आणि दक्षिण सातारा अशा दोन जिल्ह्यात झाले. द. साताऱ्याचे मुख्य ठिकाण सांगली झाले. हा जिल्हा दादांचे कार्यक्षेत्र बनला. राजकारण आणि समाजकारण या दोन्ही अंगांनी दादांचे जीवन यापुढे बहरुनच गेले ! समाजकारण करताना लहानपणापासून अनुभवलेला शेतकरी वर्ग त्यांच्या डोळ्यांसमोर होता. भारतात ७० टक्के लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय असल्याने, त्यांच्या प्रगतीवरच देशाची आर्थिक सुस्थिती, व औद्योगिक विकास अवलंबून आहे, याची दांदाना जाणीव होती. पण त्याचबरोबर पिढ्यान्पिढ्या शेती करुनही, सर्वसामान्य शेतकरी कर्जबाजारी राहिला, ही वस्तुस्थिती पण त्यांच्या मनाला क्लेश देत होती. शेतकऱ्यांच्या शेतीमालास योग्य बाजारभाव मिळून, चार पैसे त्यांच्या गाठीला राहतील, हा दिलासा त्याना मिळणे अत्यावश्यक होते. त्यासाठी एकच मार्ग होता. तो म्हणजे नियंत्रित बाजारपेठेचा. अर्थात् ही गोष्ट अमलात आणणे सोपे नव्हते. सांगलीच्या राजेसाहेबानी पूर्वी यासंबंधात केलेला प्रयत्न व्यापारांच्या असहकारामुळे फसला सांगली आणि सांगलीकर.. ..२१४