पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भेटून 'ग्रेट एस्केप'च्या या योजना आखल्या जाऊ लागल्या. त्यांच्यावर चालू असलेल्या खटल्याचा निकाल सोमवारी २४ जुलैला लागणार होता. २२ला शनिवार म्हणजे बाजारचा, गर्दीचा दिवस. त्याचा फायदा अठवावा, नदीकाठच्या साचलेल्या गाळातून पलायन केले तर पोलिसाना पाठलाग करणे अवघड असा सर्व राजबंद्यांचा हिशोब होता. दुपारी दोनच्या सुमारास प्रातर्विधीसाठी काही कैद्यांना बाहेर काढले, तेव्हा चपळाईने दादांनी एका शिपायाची बंदूक हिसकावून घेतली. इतर कैद्यानी अगाचच आमच्या दादाना का पकडले ? दादाना का पकडले? असा खोटाच गलका सुरु केला. एक-दोन दिवसात खटल्याचा निकाल लागणार होताच; खेरीज शिपायांच्या डोक्यात शनिवारच्या बाजार - खरेदीचा विचार होता. त्यामुळे निर्माण झालेली थोडी ढिलाई आणि आताचा गलका यामुळे भांबावलेल्या शिपायांवर, बराकीतील बंदुका काबीज करुन रोखल्या गेल्या. हालचाल कराल तर गोळ्या घालू अशा धमक्या देत १६ कैदी तुरुंगालगतच्या तटावर चढले. सांगलीचा तुरुंग हा गणेशदुर्गात असून, पूर्वी त्याच्या चारी बाजूनी खोल खंदक होता. पावसाळ्याचे दिवस असल्याने खंदकात पाणी होते. दादानी आणि इतरानी त्यामध्ये अड्या मारल्या व पोहून पलीकडे गेले. अडी नीट न पडल्याने एकाचा पाय मोडला. सांगलीच्या मारुती मंदिराच्या बाजूने मंडळी बाहेर पडली आणि कृष्णा नदीच्या पुलापलीकडील बाजूने पळत सुटली. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वसंतदादानी बाजीप्रभूप्रमाणे खिंड अडविली. मरण हाताच्या अंतरावर अभे होते पण ते दादांचे प्राण हिरावू शकले नाही. नियतीचीच अच्छा त्यांचेकडून काही भरीव कामगिरी करुन घेण्याची होती. बेशुद्धावस्थेत पडलेल्या दादाना जबर जखमी अवस्थेत, सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अॅडमिट् केले गेले. त्यांचेवर मोठे ऑपरेशन होऊन बरगड्यांतून गोळ्या काढल्या गेल्या. त्यातून पूर्ण बरे झाल्यावर पुन्हा दादा बंदिस्त झाले. खटल्याचा निकाल लागून दादाना एकूण १३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. येरवडा जेलमध्ये त्यांची रवानगी झाली. खतरनाक कैदी म्हणून दादाना दंडाबेडीत ठेवले गेले. खडतर कष्ट, झोप नष्ट करणारे असंख्य ढेकूण, अंगाला जागोजागी टोचणारे जाडेभरडे कपडे असा असह्य जीवनप्रवास सुरू झाला. अशा धामधुमीत १९४६ साल अजाडलं. दुसरे महायुद्ध संपले. त्यामुळे आपल्या साम्राज्यावर कधीहि सूर्य मावळत नाही अशी घमेंड मारणाऱ्या ब्रिटीश सत्तेची हाडे खिळखिळी झाली होती. स्वातंत्र्य त्यामुळेच आता दृष्टिपथात आलं होतं. वसंतदादांची सक्तमजुरी सांगलीच्या जनतेला साहवेना. त्यांची सुटका व्हावी म्हणून मोर्चे, आंदोलने यांची एकच धमाल अडाली. वसंतदादा सांगली संस्थानचे कैदी होते. सांगलीच्या सांगली आणि सांगलीकर.. ..२१३