पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हा तुरुंगवास म्हणजे दादाना एक प्रकारचे वरदानच वाटले. काकासाहेब गाडगीळ, बाळासाहेब खेर, सरदार पटेल अशा ज्येष्ठ नेत्यांच्या ते संपर्कात आले. या तुरुगवासानंतर वसंतदादांचा आत्मविश्वास दुणावला. त्यात १९४२ चे 'चलेजाव' आंदोलन सुरु झाले. सुभाषबाबूंचा सशस्त्र क्रांतीचा लढा सुरु झाला. त्याचा त्यांच्या मनावर काहीसा प्रभाव असावा. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी बलाढ्य ब्रिटीश सत्तेविरुद्ध लढा द्यायचा म्हणजे निव्वळ सत्याग्रह - मोर्चे आंदोलनानी काही साधत नाही. त्यापेक्षा थोड्या वेगळ्या मार्गाने जाऊन, गनिमी काव्याने सरकारशी लढा द्यावा असा विचार वसंतदादा आणि त्यांचे सहकारी यांच्या मनात येऊ लागला. तारुण्यातील रग अंगात होतीच. ब्रिटीश सरकारची सत्ता खिळखिळी करायची, तर त्याना काही तरी त्रास पोचेल असे धक्कादायक करायला हवे असे सर्वाचे मत `झाल्यामुळे पोस्टाच्या थैल्या पळवणे, रेल्वे लुटणे, असे प्रकार सुरु झाले. नांद्रे आणि कर्नाळ स्टेशनाच्या मध्ये रेल्वे पाडण्यात आली. सुरुवातीच्या काळात अशा सशस्त्र हल्लयांमध्ये भाले, कुऱ्हाडी, गोफणी, काठ्या अशी हत्यारे वापरली जात. पण अशा हत्यारांनी भागणारे नव्हते. बंदुकी, रिव्हॉल्वर्स सारख्या आधुनिक शस्त्रास्त्रांची आवश्यकता होती. त्यासाठी पैशांची आवश्यकता पडली म्हणून गोरगरिबांना नाडणाऱ्या व्यापाऱ्यांच्या घरांवर धाडी टाकण्यास सुरुवात झाली. त्यातून मिळालेल्या पैशाच्या जोरावर वसंतदादा गोव्याला जाऊन हत्यारे घेऊन आले. (त्यावेळी तेथे पोर्तुगीजांची सत्ता होती) या अशा अलाढालींमुळे वसंतदादांच्या खात्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्याकाळी रु.१०००/- चे बक्षिस त्याना पकडण्यासाठी ब्रिटीश सरकारने लावले होते. त्यामुळे वसंतदादाना भूमिगत अवस्थेत अर्धपोटी राहावे लागे. पोलिस सतत मागावर असल्याने त्याना चुकवण्यासाठी रानातून छपावे लागे. मग काय आज गंवताच्या गंजीवर, तर अद्या रानातल्या मळीवर, रात्र रात्र काढावी लागे. घरची माणसे दिसणे मुष्किल, मग त्यांच्या गाठी-भेटी कुठल्या? इकडे पोलिस पद्माळे गावातील लोकांना वसंतदादांचा ठावठिकाणा मिळावा म्हणून छळत असत. शामरावांचा तर अनन्वित छळ झाला. मारहाण झाली. पण माहीत असूनहि त्यांच्यापैकी कुणीही पोलिसांच्या ताकास तूर लावून दिली नाही. एका बाजूला असे निष्ठावंत होते तसे दुसऱ्या बाजूला स्वार्थी वृत्तीचे घरभेदेपण होते. त्यामुळेच वसंतदादा २२ जून १९४३ ला पकडले गेले. सांगलीच्या गणेशदुर्गात अितर कैद्यांबरोबर त्याना डांबण्यात आले. खटला सुरु झाला. शिक्षा नक्की होती. फांशी का जन्मठेप ? एवढाच प्रश्न होता. पण वसंतदादा असे थोडेच फुकाफुकी खितपत पडणार होते ? अितर राजबंद्यांबरोबर त्यानी संधान बांधायला सुरुवात केली. प्रातर्विधीच्या निमित्ताने एकमेकाना सांगली आणि सांगलीकर.. ..२१२