पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नुसत्या 'दादा' या प्रेमळ संबोधनाने, अभ्या महाराष्ट्राला परिचित असलेले आणि अभिमानाचा विषय झालेले वसंतदादा पाटील. ऐन स्वातंत्र्यसंग्रामात सांगलीच्या गणेशदुर्गात असलेल्या तुरुंगातून, त्यांनी धाडशी बेत आखून, आपल्या १४ सहकाऱ्यांना बरोबर घेऊन पलायन केले. तटाभोवतालच्या खंदकात असलेल्या पाण्यात अड्या टाकून पळताना काहींची हाडे मोडली. पाय तुटले. नदीतून पळताना काही जखमी झाले. मृत्युमुखी पडले. केवळ वसंतदादांच्या आयुष्याची दोरी बळकट म्हणून जबर जखमी होऊनसुद्धा, शरीरातील गोळ्या काढल्यावर ऑपरेशन यशस्वी होऊन ते वाचले. अशा या वसंतदादांचा जन्म १३ नोव्हेंबर १९१७ सालचा. पुढे आयुष्यात सांगली ही त्यांची कर्मभूमी झाली असली तरी त्यांची जन्मभूमी कोल्हापूरची. मूळ गाव सांगलीपासून ३ मैलावर असलेले, श्रीगुरुदत्त माऊलीच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले पद्माळे हे होते. आज कुणाला माहीतहि नसेल पण वसंतदादांचे पाळण्यातील नाव ‘यशवंत' होते. काय योग पहा. आयुष्यात दुसऱ्या एका 'यशवंताच्या' सहवासातच त्यांचे कर्तृत्व फुलले; सर्वाथाने ते यशवंत झाले. अवघे दहा महिन्याचे असतानाच, छोट्या वसंताच्या मातोश्री रुक्मिणीबाई आणि वडील बंडुजी पाटील यांचे तापसरीने (एन्फ्लूएंझा) निधन झाले. अवघ्या दोन तासांच्या अंतराने नियतीने एकाच दिवशी दोघांचा बळी घेतला. वसंता आणि त्यांचे थोरले बंधू शामराव यांचा सांभाळ त्यांच्या आजीने केला. वसंतदादांचे मामा दत्तोबा तातोबा पाटील हे आपल्या बहिणीच्या कुटुंबावर आलेल्या दुर्दैवी प्रसंगात धावून आले. त्यांनी सर्वांना आपल्या कागल गावी नेले. थोरला शामराव १३-१४ वर्षाचा आणि धाकटा वसंता १० वर्षांचा झाल्यावर, आजी त्याना पुन्हा पद्माळे गावी घेऊन आली. गावकऱ्यांच्या मदतीने तिने घरची शेती कसायला सुरुवात केली. योगायोगाने त्याच वेळी गावात नुकतीच प्राथमिक शाळा सुरु झाली होती आणि ती सुद्धा आजीनेच मोकळ्या करुन दिलेल्या घराच्या जागेत. त्यामुळे वसंतदादांचे चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण तिथेच झाले. पाचवीसाठी शेजारच्या कर्नाळ गावच्या शाळेत त्यांचे नाव घालण्यात आले. त्याच वर्षी सोलापूरच्या मल्लाप्पा धनशेट्टी वगैरे चार क्रांतिकारकांना तत्कालीन ब्रिटीश सरकारने फाशी दिले. त्या घटनेचे गंभीर पडसाद सर्वत्र अमटले. आपल्या देशाच्या पारतंत्र्याची पहिली वास्तव आणि कठोर जाणीव या प्रसंगाने छोट्या वसंताच्या मनावर झाली. फाशी झाली तो दिवस मकर-संक्रांतीचा होता. वसंतदादानी स्वतः तो सण पाळला नाहीच पण इतरानाहि पाळू दिला नाही. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर फासावर लटकलेल्या हुतात्म्यांची स्मृती म्हणून त्यानी प्रतिज्ञापूर्वक चहा सोडला. त्यांनतर देश स्वतंत्र झाल्यावरच त्यानी पुन्हा चहाला तोंड लावले ! ह्या घटनेने कळत न कळत त्यांच्या आयुष्याला वेगळेच वळण लागत गेले. सांगली आणि सांगलीकर.. २१०