पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्वातंत्र्योत्तर काळातील सांगलीचे भाग्यविधाते वसंतदादा पाटील “कैदी पळाले. कैदी पळाले. तुरुंग फोडला" सगळीकडे एकच कोलाहल माजला. पाठोपाठ संस्थानी शिपायांच्या शिट्टयांचे कर्णकर्कश आवाज आले. गोळीबारांच्या फैऱ्यांचे आवाज येऊ लागले. शनिवारचा दिवस म्हणजे सांगलीच्या बाजारचा दिवस. भाजीवाले, फळवाले, चार पैसे कमवायला आलेले खेडूत, गिऱ्हाइके सर्वांची पळापळ झाली. घाबरगुंडी अडाली. भर बाजारातून काही कैदी आयर्विन पुलाकडे पळताना दिसले. पाठोपाठ पाठलागावर असलेले घोडेस्वार दौडत आले. कुणा कैद्यांनी ऐन जुलैमध्ये तुडुंब भरुन वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या विशाल पात्रात अड्या मारल्या. काहीजण पुलावरुन भरधाव पळाले. पलीकडे असलेल्या सांगलीवाडी गावातून कृष्णा नदीच्या पैलतीरावरुन धावू लागले. मागून सटासट गोळ्यांचा वर्षाव होत होता. नदीच्या पात्रातून पोहणाऱ्या एका कैद्याला वर्मी गोळी बसली. लालसर रंगाचे कारंजे अडाले. पाच-सहा कैदी नदीकाठाने धावत होते. त्यांच्या पिछाडीशी शिपाई येऊन भिडले. प्रसंग बाका होता. तेव्हा त्यांच्या नायकाने इतराना ओरडून सांगितले "तुम्ही पळा. नदी पोहून हरीपूरच्या बाजूने सटका. तोवर मी या शिपायाना अडवतो.” इतके बोलून नदीकाठच्या दाट झाडीच्या आश्रयाने, त्याने पाठीवरच्या पोलिसांवर बंदुकीतून बार काढायला सुरुवात केली. या अनपेक्षितपणे झालेल्या प्रतिहल्ल्याने पाठलागावरचे पोलिस भांबावले. त्या गडबडीचा फायदा घेऊन बाकीचे सहकारी पुढे पळाले; अिकडे त्या नायकाचा गोळीबार चालूच होता. फैरीवर फैरी काढता काढता ८५ बार काढून झाले. पण दुर्दैव आडवे आले. बंदुकीचा घोडा अडला. त्या शूराने झाडाचा आडोसा घेत बंदुकीचा घोडा ओढायला सुरुवात केली. त्या धावपळीत झाडाच्या बुंध्याबाहेर आलेला त्या वीराचा खांदा पोलिसांना दिसला. क्षणाचीहि असंत न देता गोळ्यांचा वर्षाव झाला. गोळी खांद्यातून आरपार गेली. डोळ्यासमोर अंधेरी आली. तो शूर नायक धाडकन् जामिनीवर कोसळला. बेशुद्ध पडला. लागलीच त्याला जेरबंद करण्यात आले. हा निधड्या छातीचा शूरवीर म्हणजे वसंत बंडूजी पाटील. आपल्या कर्तृत्वाने सांगली आणि सांगलीकर.... .२०९