पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मिळून त्यानी पंचवीस तरी मळे तयार केले. त्यात आंबराई व हिराबाग प्रथम तयार करण्यात आली. कुटुंबातील सर्व माणसांच्या नावे, आप्पासाहेबानी मळे तयार केले होते. अदा. तात्यासाहेब मळा, रावसाहेब मळा, बापूसाहेब मळा, बाईसाहेब मळा वगैरे. अनेक बागांमधून ते स्वतः जात आणि जातीने थोडे काम करीत. चांगल्या तऱ्हेचे अंजीर, द्राक्षे, आंबे वगैरे फळे पंढरपूर वगैरे देवालयात पाठवून देत. गुलाबांची फुले तर दहा हजारांहून अधिक निघत असत असं तत्कालीन पत्रव्यवहारांमध्ये नमूद केलेले आहे. आप्पासाहेबांच्या या बागांच्या आवडीवरून एका तत्कालीन कवीने म्हटले आहे. सांगलीला जा मनुजा श्रीगणपती पाह्याला । जे गजवक्त्रसुनेत्रचतुर्भुज तद्रुपाध्यायाला ॥ यत्पृष्ठभागी शोभे कृष्णा तत्सलिली नाह्याला । जागा जागा बागा त्यातील फळ पुष्पे वाह्याला ॥" बागबगींच्याबरोबरच अत्तम जातीच्या गाईबैलांची पैदास वाढविण्याची त्यांची खटपट असे. बाहेरून चांगल्या जातीचे वळू मिळवून, त्यांची चांगली निपज करण्यात आप्पासाहेबानी चांगले यश मिळविले. त्या काळी लष्करातील तोफा ओढण्यास चांगले बैल म्हणजे बळकट बैल लागत. बेळगावच्या इंग्रज फलटणीना असे बैल पुरवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. म्हणून या कामामध्ये त्यानी रस घेतला असावा. इंग्रजांच्या सुधारणांनी जसे काही सुशिक्षितांना दिपवून टाकले होते तसे त्यांच्या छापखान्याच्या शोधामुळे आप्पासाहेब भारावून गेले होते. बाळशास्त्री जांभेकरांचे ‘पंचोपाख्यान’ इंग्रजानी छापले तेव्हा ते बघून आप्पासाहेब अितके हरकून गेले की ताबडतोब पुणे-मुंबईकडे माणसे पाठवून, आवश्यक ती अपकरणे आणवून, तंत्रज्ञान शिकून घेऊन १८२१ मध्येच त्यानी सांगलीत छापखाना (शिळाप्रेस) सुरू केला. आणि त्या छापखान्यात, 'भागवत' पुराणाच्या प्रती छापवून, चातुर्मासात ब्राम्हणांना दक्षिणेसह दिल्या. आप्पासाहेब विलक्षण कल्पक होते. जुनी माहिती मिळेल तेथून जमविण्याची त्यांची नेहमी धडपड असे. पेशवाईचा अस्त झाल्यावर घरी बसलेल्या लोकांकडून त्यानी दुर्मिळ माहिती मिळवून आपल्या संग्रही ठेवली होती. नाना फडणीस यांची पत्नी मेणवलीस राहात होती. त्यांच्याकडून त्यानी बरेच कागद मिळवले होते किंवा काही नकला करवून आणल्या होत्या. त्याचबरोबर पटवर्धन घराण्याचा एक मोठा वंशवृक्ष १८३५ च्या सुमारास त्यानी तयार करवून घेतला होता. वास्तविक पटवर्धन जहागिरीचे मिरज हे मुख्य ठाणे. सांगली त्या तुलनेत सांगली आणि सांगलीकर.. .२०७