पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हवी होती. त्यामुळेच गृहकलह वाढत राहिला. अगदी पेशवाईतील राघोबादादा आणि माधवराव यांच्यामधील गृहकलहासारखाच. परिणामी, पेशवे दरबारच्या संमतीने मिरज जहागिरीचे विभाजन झाले. १८०० च्या जानेवारीत वाटणीची यादी झाली. (या यादीला ‘वाटणीची यादी' असे न म्हणता 'घरसमजूत' असे म्हणत.) आप्पासाहेब हे पटवर्धन घराण्यातील वडील शाखेचे आणि पटवर्धन जहागिरीचे मुख्य सरदार. त्यामुळे मिरज ठाणे आणि मिरज किल्ला त्याना मिळावयास हवा होता. तसा त्यांचा आग्रहही होता. पण अखेरीस मध्यस्थांच्या विनंतीवरून त्यानी तो आग्रह सोडला. सहा लाखाचा मुलूख घेऊन ते बाहेर पडले. आपल्या मुलुखातील कृष्णानदीकाठचा सांगली गाव त्याना आवडला. म्हणून आपली संस्थानची राजधानी सांगली हीच त्यानी ठरवली. त्यावेळी सांगली गाव नदीकाठच्या भागापुरतेच सीमित होतं. म्हणून आप्पासाहेबानी पद्धतशीरपणे पेठा आखून गाव वसवण्यास सुरुवात केली. राहावयास सुरक्षित जागा हवी, म्हणून कृष्णा नदीपासून ४-५ फर्लांगावर अत्तराभिमुख किल्ला आणि राजघराण्यातील मंडळीना राहण्यासाठी वाडा बांधण्याचे आप्पासाहेबानी ठरविले. तो किल्ला म्हणजेच आजचा गणेशदुर्ग. आप्पासाहेब सांगलीत नेमके कोणत्या वर्षी आले याचा अल्लेख मिळत नाही. कारण वाटण्या झाल्याझाल्याच त्याना पेशव्यांचे सरदार म्हणून युद्धात अडकून पडावे लागले. त्यामुळे गणेशदुर्ग बांधकामास विलंब लागला. करवीरकर छत्रपतींबरोबर पेशवे दरबारचे काही वैमनस्य आले होते. तेव्हा त्यांच्यावर चालून जाण्याची आज्ञा परशुरामभाऊ पटवर्धन याना झाली. त्यांच्याबरोबर आप्पासाहेब गेले. हरिपूर-समडोळीत, कृष्णा नदीच्या काठी, आप्पासाहेब आणि करवीरकर मंडळी यांच्यामध्ये चकमकी झाल्या; तेव्हा करवीरकर मंडळी माघारी गेली. दरम्यान निपाणीजवळ परशुरामभाऊ पटवर्धन आपला गोट घेऊन होते. ते बेसावध असताना करवीरकर मंडळीनी त्यांच्यावर हल्ला चढवून त्याना निर्दयपणे मारले; तेव्हा सर्व पटवर्धन मंडळी कोल्हापूरवर चाल करून गेली. करवीर शहरावर आप्पासाहेबानी मोर्चे लावले. मात्र याच सुमारास बाजीरावसाहेब पेशवे आणि दौलतराव शिदें. या दोघांमध्ये मोहिमेविरुद्ध काही मसलत ठरत होती. त्यामुळे पटवर्धन मंडळीना वेढा अठवावा लागला आणि आप्पासाहेब सांगलीस परतले. ह्या सर्व घडामोडी फेब्रुवारी १८०० च्या दरम्यान घडल्या. यानंतरची आप्पासाहेबांच्या जीवनातील मोठी घटना म्हणजे धोंडजी वाघाबरोबरची लढाई. त्याच वर्षाच्या अत्तरार्धात, कर्नाटक भागात धोंडजी वाघ नावाच्या लुटारूने स्वतःजवळ फौजफाटा बाळगून इंग्रज, पेशवे, पटवर्धन, रास्ते वगैरेच्या कर्नाटक भागातील मुलुखात बरीच लुटालूट चालवली होती. त्याच्यावर इंग्रजातर्फे जनरल वेलस्ली, पेशव्यांतर्फे सरदार धोंडोपंत गोखले, (सेनापती बापू गोखले यांचे चुलते) सांगली आणि सांगलीकर... २०४