पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०० वर्षांच्या सांगलीचा जन्मदाता थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन प्रत्येक गावाला स्वतःचा असा काही चेहरा-मोहरा असतो. स्वतःची अशी ओळख असते. सांगली गावाचं अस्तित्व इ.स. १८०० पूर्वी अगदी नगण्य होतं. आज कुणाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. १७६८ च्या सुमारास हरिपूर हे गाव सांगलीच्या दुप्पट होतं. सांगलीची लोकवस्ती एक हजार तर त्यावेळी हरिपूरची वस्ती दोन हजार होती! आज तेच हरिपूर सांगलीचं अपनगर शोभेल ! संगीत, साहित्य, नाट्य, क्रीडा, वैद्यक, राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रात, सांगलीचं नाव सर्वत्र दुमदुमत आहे. सांगली नगरीला असा 'नवा चेहरा' मिळवून देण्याचं ऐतिहासिक कार्य केले ते चिंतामणराव (थोरले) आप्पासाहेब पटवर्धन या सांगली संस्थानच्या पहिल्या .अधिपतीनी. पेशवाई कालखंडात मिरज येथे पटवर्धन सरदारांची मूळ जहागीर होती. घरगुती कलह सुरू झाल्यावर, मिरज जहागिरीची वाटणी होऊन, अपरोक्त चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन बाहेर पडले. कृष्णाकाठी असलेलं सांगली गाव त्यानी आपल्या संस्थानची राजधानी म्हणून निवडलं. योग्य ती बांधकामे वगैरे झाल्यावर, १८०१ मध्ये जरी सांगली अधिकृतपणे संस्थानची राजधानी झाली, तरी जानेवारी १८०० मध्येच सांगलीत येऊन आप्पासाहेबानी नवीन पेठा वसवून सांगली गावाचा चेहरा- मोहरा बदलण्यास सुरूवात केली. एका अर्थी आज दिसणाऱ्या आधुनिक सांगलीचा तो जन्मच म्हणायचा ! तेव्हा सांगलीच्या २०० व्या वाढदिवसाच्या निमित्तानं, सांगलीच्या त्या भाग्यविधात्याचं, चिंतामणरावांचं चिंतन करणं समयोचित ठरेल. या आप्पासाहेबांचा जन्म ५ जानेवारी १७७५ रोजी मिरज किल्ल्यात झाला. सवाई माधवराव आणि दुसरे बाजीराव पेशवे या दोन्ही पेशव्यांचा जन्म त्याच वर्षातील होता. सरदारकीची वस्त्रे आप्पासाहेबाना ६ फेब्रुवारी १७८३ रोजी मिळाली; मात्र त्यावेळी ते केवळ ८ वर्षांचे असल्याने, जहागिरीची सर्व व्यवस्था त्यांचे चुलते गंगाधरपंत पहात असत. गंगाधरपंतांच्या मनातून सरदारकीची वस्त्रे त्यानाच मिळावयास सांगली आणि सांगलीकर.. . २०३