पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सांगलीत त्याकाळी संगीताचे जलसे, मैफली फक्त सांगली जिमखान्यातच होत असत आणि गाणारी मंडळी डॉ. देसाई यांच्या घरीच अतरत. त्यामुळे हिराबाई बडोदेकर, गंगूबाई हनगल, मोगूबाई कुर्डीकर, मा. कृष्णा अशा अनेकांचे प्रत्यक्ष गाणं नाटेकरानी ऐकलचं पण अतर कुणाला मिळणार नाही अशी त्यांचा रियाझ ऐकण्याची संधी पण त्याना मिळाली. भविष्यकाळात ज्या लता मंगेशकरांच्या हस्ते त्यानी बक्षिसे घेतली त्या लताचं गाणं त्यानी लहानपणी सांगली जिमखान्यात ऐकलं. त्यावेळी सांगलीत राहाणाऱ्या लताबाई अवघ्या १२।१३ वर्षाच्या होत्या. या संगीताच्या प्रेमापोटीच नाटेकरानी आपल्या मुलीचं नाव 'संगीता' ठेवलं असावं! त्यांच्या मनात आजच्या क्षणीही सांगलीच्या आठवणी सजग असतात. सांगलीचं बालपण आठवतं. न्यूयॉर्कच्या रस्त्यातून हिंडताना, गगनचुंबी - स्कायस्क्रेपर्स बघून त्यांना सांगलीच्या श्रीगजानन मिलचा अंच टॉवर आठवे आणि असे किती टॉवर्स म्हणजे ही न्यूयॉर्कची स्कायस्क्रेपर होईल ? या अंचीचे गणित ते मनातल्या मनात मांडून बघत. (कारण लहानपणी जास्तीत जास्त अंचीची कल्पना म्हणजे गजानन मिलचा टॉवर ! ) आपल्या खेळाने बॅडमिंटनमध्ये एक 'युग' निर्माण करणाऱ्या आणि सांगलीचं नाव साऱ्या जगतात अज्ज्वल करणाऱ्या नंदू नाटेकर यांच्याविषयी सांगलीकरांच्या मनात सदैव अभिमानाचीच भावना राहील यात काय शंका ? सांगली आणि सांगलीकर... ..२००