पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पसरली. आणि अशा आणिबाणीच्या वेळीच नाटेकरांचं खरं कसब बघायला मिळतं. त्यानी आपलं सर्वस्व पणाला लावलं आणि नंतर मात्र सेठला एकही पॉईंट न मिळवू देता त्यानी १८ - १५ अशी मॅच जिंकली. नाटेकरांच्या खेळाची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या भात्यात सर्व प्रकारचे फटके होते. अत्युत्तम पवित्रा, अचूक ड्रॉप्स, ठणठणीत स्मॅश अशी अनेक वैशिष्ट्ये त्यांच्या खेळात असली तरी त्यांचं अमोघ अस्त्र म्हणजे त्यांचा लाजवाब बॅकहँड ! ज्याच्या खेळामुळे, टेनिस का बॅडमिंटन ? असा नाटेकरांचा 'हॅम्लेट' झालेला यक्षप्रश्न सुटला, तो मलायाचा वांग पेंग सेन सा हा नाटेकरांचा आदर्श होता. तसा बॅकहँड आत्मसात करण्यासाठी नाटेकरानी प्रचंड मेहनत घेतली. मुंबईत शिकत असताना आपल्या खोलीतल्या भिंतीवर ते जोराने बॅडमिंटन शटल मारून आपटत आणि ते वळून परत यायच्या क्षणी भर्रकन वळून त्याला बॅकहँडचा टोला लगावत! यामुळे अचूक टायमिंग साधण्याचे कौशल्य त्यांच्या अंगी आले. त्याचबरोबर त्यांचा स्वत:चा डिफेन्स भक्कम होता. इंग्रजीत 'वॉटर-टाईट डिफेन्स' म्हणतात तसा. कुणाचंहि कोचिंग न मिळालेले नाटेकर खऱ्या अर्थाने स्वयंभू होते! हॅमरगार्ड हॅनसेन या डॅनिश खेळाडूचे स्मॅशेस् अितके जोरदार असत की बॅडमिंटन फुलाचे पंख फटक्यात गळून पडत! असे जोरदार स्मॅशेस नाटेकर अगदी सहजपणे परतवून टाकत. त्यांच्या स्वत:च्या खेळात आक्रस्ताळेपणा किंवा अगाच शक्तिप्रदर्शन कधीच नसे. त्यांचा खेळ हा चातुर्याचा, बुद्धिचा खेळ असे. स्मॅश अगाच जोरात मारायचा नाही, जेव्हा केव्हा स्मॅशचा अपयोग करायचा तेव्हा तो अगदी नेमकेपणाने आणि अचूक टायमिंग साधून करत. त्यामुळे त्यांचा स्मॅश, बरोबर प्रतिस्पर्ध्याच्या खेळणाऱ्या हाताच्या, छाती आणि कंबर याच्यामधल्या शरीराच्या भागात जाई आणि प्रतिस्पर्धी गोंधळून जाई. स्मॅश परतवून लावणं त्याला अशक्य होई. हमखास पॉईंट नाटेकराना मिळून जाई. त्यांच्या अशा भेदक नेमकेपणामुळे मोठमोठे खेळाडू त्यांच्यासमोर केविलवाणे भासत! अगाच जीव काढून खेळलेला खेळ हा 'निर्गुणी' असतो! अशा अर्थाने की त्या खेळाला गुण (पॉईंट) मिळत नाही! त्या दृष्टीने नाटेकरांचा खेळ 'गुणवान' होता. ऐन अमेदीतील त्यांचा खेळ पहाणारे रसिक त्यांच्या खेळातील 'डेलिकसी ' बघून त्यांच्या खेळाला 'पोओट्री' म्हणत असत. फूल, मग ते बागेतील असो किंवा बॅडमिंटनचे असो, ते कसं नाजूकपणानेच हाताळायला हवं! ती नाजुकता, कलात्मकता त्यांच्या खेळात होती. त्यांचं बॅडमिंटन कोर्टावरचं फूटवर्क म्हणजे एखाद्या स्वर्गीय नर्तिकेचा पदन्यास भासावा, असं होतं. विलक्षण चापल्य त्यात होतं. त्यांचं सुंदर पदलालित्य आणि खेळातील नजाकत बघूनच रसिकजन त्यांच्या खेळाला मूर्तिमंत 'काव्य' म्हणत असत. सांगली आणि सांगलीकर.. ..१९८