पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मलेशियाचे होते तर कॉबरो डेन्मार्कचे होते. १९६१मध्ये नाटेकरानी राष्ट्रीय तिहेरी मुकुट जिंकला तेव्हा ती एक मोठी कामगिरी गणली गेली. कारण १९३८-३९ नंतर २०-२२ वर्षामध्ये असा पराक्रम कोणी केला नव्हता! अशी देदिप्यमान कामगिरी नोंदवत असताना आणि जिकडे-तिकडे 'नाटेकर, नाटेकर' असं नाव दुमदुमत असतानाच २९ जानेवारी १९६६ ला मोठ्या स्पर्धांमधील एकेरी सामन्यांमधील निवृत्ती त्यानी जाहीर केली. अर्थात मिश्र सामने, दुहेरी सामने आणि व्हेटरन्स मॅचेस ते खेळत राहिले. १९६५ मध्ये जमैकामधील (वेस्ट इंडिज) कॉमनवेल्थ मॅचेसमध्ये ते खेळले. १९८०, ८१, आणि १९८४ मध्ये त्यानी ऑल इंग्लंड व्हेटरन्स डबल्स ची अजिंक्यपदे मिळवली. कॅनडामध्ये वर्ल्ड मास्टर्स बॅडमिंटन चैंपियनशिप १९८५ मध्ये प्रथमच सुरु झाली, तेव्हा नाटेकराना सिल्व्हर मेडल मिळाले. तसंच डेन्मार्कमध्ये १९८९ साली व्हेटरन्स डबल्समध्ये सिल्व्हर मेडल मिळालं. बॅडमिंटन खेळण्यासाठी वरील देशांखेरीज अमेरिका, कॅनडा, न्यूझीलंड अशा विविध देशांमध्ये त्याना खेळायला मिळाले. १९६१मध्ये राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत, नाटेकरानी अनेक वर्षांचा विक्रम मोडून तिहेरी मुकुट मिळवला, तेव्हा भारत सरकारने 'अर्जुन अॅवार्ड' द्यायला सुरुवात केली होती. सुरुवातीचं पहिलंच 'अर्जुन' नाटेकराना देण्यात आलं. देशात आणि परदेशात त्याना अनेक सन्मान लाभले. नाटेकरानी गाजवलेल्या मॅचेसच्या, आजहि प्रसंगा-प्रसंगाने बॅडमिंटन रसिकांमध्ये आठवणी निघतात. अटळ पराभव समोर दिसत असतानासुद्धा त्यानी अनेक मॅचेस आश्चर्यकारकरीत्या फिरवून विजयश्री संपादन केली आहे. पाकिस्तानचा शमशाद अली, थायलंडचा वाट्टाना सिन यांच्याबरोबर त्यांचे काही संस्मरणीय सामने झाले आहेत. १९५८ साली सी. सी. आय. ला, डेन्मार्कच्या एरलंड कॉपसबरोबर झालेल्या मॅचच्या आठवणी अजून जाणकार रसिक काढत असतात. अगदी प्रतिस्पर्ध्याच्या घशात गेलेली मॅच परत खेचून आणण्याचा चमत्कार त्यानी अनेक वेळा केलेला आहे. अशावेळी त्यांची त्रिलोकनाथ सेठबरोबरची रंगलेली एक झुंज कोण विसरू शकेल? पहिला गेम नाटेकरानी १५-८ असा जिंकला होता. पण दुसरा गेम सुरु झाला तेव्हा सेठने स्वत:ला खूप सावरले. भराभर नऊ पॉईंट्स त्याने मिळवले तेव्हा नाटेकरांच्या खात्यात अवघा एक पॉईंट होता! दमदारपणे खेळत नाटेकरानी सेठला दहा पॉईंटवर गाठले. दोघेही दहावर होते. अशीच अटीतटीची झुंज चालू राहिली. आणि दोघांचे प्रत्येकी १५ गुण (फिप्टीन ऑल) झाले. आता मात्र खेळणारे खेळाडूच काय पण सगळे प्रेक्षकच घामाघूम झाले. संपूर्ण कोर्टभर स्मशान शांतता सांगली आणि सांगलीकर... १९७