पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रोमांचकारी मॅच जिंकली. पुढची मॅच रमेश देसाईंबरोबर ( १५ - ६, १५ - २) अशा मोठ्या फरकाने जिंकून नाटेकरानी त्या वर्षीची चँपियनशिप आरामात जिंकली. यापुढील आयुष्यात अनेक चित्तथरारक सामने नाटेकरानी जिंकले असले तरी देविंदरवर मिळवलेल्या विजयामुळे नाटेकराना प्रथमच स्वत:ची 'ओळख' मिळाली! साऱ्या रसिकांना, समीक्षकांना कळून चुकले की काहीतरी 'अद्भुत' असं काळाच्या अदरात लपलेलं आहे. वृत्तपत्रांनी आवर्जून या घटनेची नोंद घेतली. यानंतर मात्र नाटेकरांनी मागे वळून बघितलंच नाही. त्रिलोकनाथ सेठचा पराभव करुन, १९५३ साली म्हणजे अवघ्या विशीतच त्यानी राष्ट्रीय विजेतेपद मिळविलं. यानंतर जवळजवळ ८-१० वर्षे त्यानी अनेक मानसन्मान मिळवले. या काळातील त्यांचा खेळ सतत अंचावत गेला. अितका की कौतुकाने सर्व क्रीडाशौकीन, समीक्षक या काळाला 'नाटेकर युग' असेच संबोधायचे. या कालावधीतील त्यांची आकडेवारी या कौतुकाची साक्षी आहे. त्यानी महत्त्वाच्या अशा १३४ स्पर्धा जिंकल्या. त्यात त्यानी ५३ एकेरी सामने, ४३ दुहेरी तर ३८ मिश्र सामने जिंकले. काही सामने अगदी थोड्या फरकानेच त्यांच्या हातून निसटले आणि अपविजेते पदावर त्यांना समाधान मानावं लागलं. असं अपविजेतेपद (Runner-up) एकेरी सामन्यात १३ वेळा, दुहेरी सामन्यात १४ वेळा तर मिश्र दुहेरी सामन्यात ७ वेळा त्याना मिळालं. १९५३ ते १९६५ या दरम्यान त्यानी राष्ट्रीय स्पर्धेतील ६ एकेरी अजिंक्यपदे मिळविली. सहावेळा दुहेरी स्पर्धांमध्ये तर ३ वेळा मिश्र स्पर्धांमध्ये अजिंक्यपदे मिळविली. त्यातही कौतुक म्हणजे या सर्व सामन्यात ८ वेळा त्याना अपविजेतेपद मिळालं. याचा दुसरा अर्थ असा की ८ अजिंक्यपदे त्यांची थोडक्यात हुकली ! परदेशात मोठी चँपियनशिप मिळवणारे ते पहिलेच भारतीय बॅडमिंटनपटू होते. १९५६ मध्ये मलायातील सेनेगर येथे झालेल्या सिंगल्स त्यानी मोठ्या दिमाखात जिंकल्या आणि मॅर्डेका कप जिंकला. १९६३ मध्ये तर त्यानी कॅरॉन वॉट्टनसिनला धूळ चारून प्रतिष्ठेची किंग्ज कप चैंपियनशिप जिंकली. १९५४ ते १९६३च्या दरम्यान अिंग्लंडमधील थॉमस कप टूर्नामेंट्स खेळताना १६ पैकी १२ सिंगल्स आणि १६पैकी ८ डबल्स जिंकल्या. ज्यांच्या नावे हा थॉमस कप ठेवलेला आहे ते जॉर्ज थॉमस, नाटेकरांचा खेळ पाहून अतिशय प्रभावित झाले. ते म्हणाले की, "Natekar of India is real artist of the game.........One of the very best I have seen. "जगातील सर्वोत्तम अशा पाच बॅडमिंटनपटूंमध्ये नाटेकरांचं तेव्हा चौथं स्थान होतं. (१९५४-५५ च्या मलेशियातील थॉमस कपच्या वेळी) अितर चार दिग्गजांची नावे वाचली तरच त्यांच्या या महानतेची किंमत कळेल. अितर चौघांपैकी एडी चुंग, वांग पेंग सून, ऑग पॉ हिम सांगली आणि सांगलीकर. ..१९६