पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तरी प्रत्यक्ष नाटक रंगभूमीवर अवतरताना एकच भूमिका त्याला करायला मिळते. तसं नाटेकरांचं झालं होतं. त्यात १९५१ सालच्या टेनिस मॅचमध्ये (नॅशनल हार्ड कोर्ट टूर्नामेंट) रामनाथन कृष्णनबरोबर एकेरी, दुहेरी सामन्यात नाटेकर अपविजेते होऊन मुंबईच्या क्रीडा-जीवनात एकदम प्रकाशात आले होते. त्यांचा स्वत:चा कल टेनिस खेळण्याकडे होता. त्यांचे वडील टेनिस खेळत. आई सुमतीबाई यांच्यासह नाटेकर रत्नागिरीला १२-१३ व्या वर्षीच बॅडमिंटन - मिश्र दुहेरी सामना खेळले होते. नाटेकरांसमोर टेनिस का बॅडमिंटन असा प्रश्न अभा होता. एका म्यानात दोन तलवारी राहात नाहीत असं जाणकारांचं म्हणणं होतं. मग सर्वानुमते नंदू नाटेकरांनी बॅडमिंटनवरच सर्व लक्ष केंद्रित करावं, टेनिसला सोडचिठ्ठी द्यावी असं ठरलं. एक कारण असं होतं की त्यावेळच्या बॉम्बे स्टेट बॅडमिंटन असोसिएशनचे पदाधिकारी श्री. आगासकर आणि सुशिलकुमार रुईया याना हा खेळाडू बॅडमिंटनपासून दूर रहावा हे अजिबात पटत नव्हतं. म्हणून त्यानी नंदूच्या वडिलाना घरी जाऊन तसा आग्रह केला होता. अर्थात ही बाब सर्वस्वी खरी नव्हती. एक योगायोग असा घडला की त्याच सुमारास नंदू नाटेकरानी जागतिक कीर्तीचा बॅडमिंटनपटू वाँग पेंग सून याचा खेळ मुंबईत पाहिला आणि 'चमत्कार' पाहिल्यासारखी नाटेकरांची अवस्था झाली. बॅडमिंटनच्या खेळातील सारी सौदर्यस्थळे त्याना एकदम नव्यानेच दिसावीत अशी प्रतीत झाली आणि तेव्हापासून बॅडमिंनवर त्यांचं जसं काही नव्यानंच प्रेम जडलं! एकदा निर्णय झाल्यावर बॅडमिंटनवर त्यानी कसून मेहनत घेण्यास सुरुवात केली. पुढील वर्षीच्या म्हणजे १९५२ सालच्या वेगवेगळ्या कॉलेजातील टूर्नामेंट्स त्यानी जिंकल्या. पण बॅडमिंटन रसिकांचं लक्ष त्यानी वेधून घेतलं ते देविंदर मोहनबरोबर झालेल्या चुरशीच्या सामन्यामुळं. कारण देविंदर मोहन हा त्यावेळचा सर्वोत्कृष्ट बॅडमिंटनपटू होता. १९४९-५० चा नॅशनल चैंपियन होता. बॉम्बे प्रेसिडन्सी ओपन चैंपियनशिप्स (नंतरच्या महाराष्ट्र स्टेट) मध्ये त्यानी देविंदरचा पराभव करुन सर्वत्र खळबळ माजवून दिली. हिंदू जिमखान्यावर झालेल्या या सामन्यात सुरवातीला दोघानी एक एक गेम जिंकला. त्यामुळे तिसऱ्या गेमविषयी अत्सुकता निर्माण झाली. तिसऱ्या गेममध्ये देविंदरचे ८ तर नाटेकरांचे ४ पॉईंटस् झाले. नाटेकरानी जोर करुन १४ पॉईंटसपर्यंत मजल मारली तेव्हा आता शेवटचा मॅच पॉईंट जिंकून नाटेकर मॅच खिशात टाकतील असं वाटत असतानाच, देविंदरने अचल खाल्ली. आणखी चार पॉईंटस् मिळवून आता स्कोअर १४ - १२ झाला. आता नाटेकरांच्या हातातून देविंदर मॅच खेचून घेतो की काय असं वाटत असतानाच, एक पॉईंट मिळवून नाटेकरानी सांगली आणि सांगलीकर.. १९५