पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सावरण्यासाठी हजारेनी जे असीम कष्ट केले, त्या कष्टांना जणू 'मानवंदना द्यावी म्हणूनच त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या विजयभाईला हा विजयाचा नजराणा दिला! राष्ट्रपती, पंतप्रधान यापासून तो सर्वसामान्य रसिकांपर्यंत सर्वानी त्यांचे अभिनंदन केले. खरोखरच तो ऐतिहासिक प्रसंग होता. विजय हजारेंच्या आयुष्यात हा मोठा गौरवाचाच क्षण होता. असे असले तरी १४ सामन्यात भारताचे नेतृत्व करताना त्यानी खास कल्पकता अशी कधीच दाखवली नाही. त्याना नेहमीच ‘हरणाऱ्या' संघासाठी खेळावे लागलं. द्रुतगती गोलंदाजांचा ताफा, आक्रमक फलंदाज त्यांच्या हाताशी नव्हते या गोष्टी खऱ्या असल्या तरी कर्णधार म्हणून त्यांच्याकडे कोणतेच डावपेच नव्हते. ते जात्या अत्यंत अबोल असल्याने मैदानात काय किंवा मैदानाबाहेर काय, आपल्या सहकाऱ्यांबरोबर त्यांचा ‘संवाद' असा नव्हताच. त्यामुळे ते नम्र, निगर्वी असले तरी नेता म्हणून त्यांची छाप पडत नसे. त्यांची कारकीर्द जवळून पहाणाऱ्या विजय मर्चंट यानी फार मार्मिकपणे त्यांच्या कर्णधारपदाची मीमांसा करताना म्हटलय, ते असं: 'I wish Hajare had never captained India. He was never a leader of men. He was always a disciplined soldier, never a commander." विजय हजारे याना 'पद्मश्री' देऊन भारत सरकारने त्यांच्या क्रिकेटसेवेचा गौरव केला होता. एम्. सी. सी. ने त्याना सन्माननीय सदस्यत्व देऊन त्यांचा सन्मान केला. भारतीय क्रिकेट निवड समितीचे ते काही काळ चेअरमन होते. असा हा सांगलीकर क्रिकेटपटू आता बडोदा येथे शांतपणे, आयुष्याचे 'शतक' गाठण्याच्या प्रतीक्षेत आहे. नाबाद '८५' या धावसंख्येवर ! सांगली आणि सांगलीकर.. ..१९२