पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शतक झळकवणारा विजय मांजरेकर आणि माधव मंत्री लागोपाठच्या चेंडूवर बाद झाले होते. हजारेनी गार्ड घेतला तेंव्हा टूमन आपल्या 'भक्ष्याकडं' बघावं तसं त्यांच्याकडं पहात होता. त्याच्यामागं लॉर्ड्सवरील भला मोठा स्कोअरबोर्ड भारताचा धावफलक दाखवत होता ४ बाद शून्य ! भारताला 'कसोटी' सामने खेळण्याचा दर्जा दिलाच का म्हणून आग ओकणारी वृत्तपत्रे 'अद्या' काय लिहितील याची हजारेना कठोर जाणीव झाली. अबोल वृत्तीचे हजारे तोंडाने काय बोलणार? म्हणून ते 'बॅट'नेच बोलले! पहिला 'हॅटट्रिक' च्या अद्देशाने टाकलेला टूमनचा चेंडू भोवतालच्या क्षेत्ररक्षकांच्या कोंडाळ्यातून, हजारेनी आपल्या सणसणीत ऑन ड्राईव्हने असा काही भिरकावला की सारे क्षेत्ररक्षक बघतच राहिले! त्यांची हिंमत बघून त्यांचा जुना सहकारी दत्तू फडकर यालाही स्फुरण चढले. आपल्या झुंझार खेळीने त्यानी 'अॅडलेड' कसोटीच्या पराक्रमाची सर्वाना आठवण करुन दिली. ४ बाद ० चा धावफलक दोघानी १६५ वर पोचवला. त्यात हजारेंचा स्कोअर होता ५६ ! पण हजारेना स्वतःला याहून संस्मरणीय इनिंग आठवते ती त्यांच्या अडतीस धावांची! ओव्हलवरील शेवटच्या सामन्यात भारताच्या ५ बाद ६ अशा 'स्कोअर'वर ते खेळत होते. इंग्लंडमधील विचित्र हवामान, बेताचा अजेड, खराब खेळपट्टी, चेंडूचा अंदाज येणं मुष्किल, वेगवान टूमन, बेडसर यांच्याबरोबर लेकर-लॉक या फिरकी जोडीला साथ देणारी हिरवळ ! अशा प्रतिकूल परिस्थितीत एक एक धाव काढणे अवघड जात होतं तिथं या हजारेनी ३८ धावा काढल्या. समीक्षकांच्या मताने सुद्धा हजारेंची ही सर्वोत्कृष्ट खेळी होती. खुद्द हजारेनी लिहून ठेवलंय की या ३८ धावा मला एखाद्या शतकापेक्षाहि अधिक मोलाच्या वाटतात ! असे त्यांचे अनेक डाव सांगता येतील. पण हजारेंच्या कसोटी क्रिकेट- कारकीर्दीची मौज अशी की बव्हंशी सर्व डाव ते आपल्या संघाला वाचविण्यासाठी खेळले. एका बाजूला धडाधड विकेट्स पडत असताना दुसऱ्या बाजूला ते नांगर टाकून बसलेले असत! ( म्हणून कौतुकाने त्याना 'रॉक ऑफ जिब्राल्टर' असे म्हणत) पण गंमत म्हणजे ज्यावेळी दोन्ही डावात ते 'फेल्युअर' झाले त्यावेळी नेमका भारतीय संघाने आपल्या कसोटी जीवनातला पहिला वहिला सामना जिंकला ! कसोटी क्रिकेट खेळण्याला भारताला मान्यता मिळाल्यापासून तब्बल २५ सामने मार खाण्यात किंवा कशीबशी अनिर्णित राखण्यात गेल्यानंतर, विजय हजारे यांच्या नेतृत्वाखाली, मद्रासला अिंग्लंडविरुद्ध भारताने प्रथमच विजयश्री प्राप्त केली. हजारेंची स्वतःची 'कॉन्ट्रिब्युशन' काही नसताना. आजवर प्रत्येक पडझडीच्या वेळी भारताची बाजू सांगली आणि सांगलीकर.. १९१