पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तर पहिल्यांदाच. हजारेना लेगब्रेक, गुगली, पवित्रा ( stance) याबाबत बहुमोल धडे देणारे त्यांचे गुरु ग्रिमेट म्हणाले, “विजय, आज तू मला धन्य केलंस.” हजारेना त्याच वेळी सांगलीत क्रिकेटचे पहिलेवहिले धडे देणारे गुरु हणमंतराव भोसले यांची प्रकर्षाने आठवण झाली. हा त्यांचा विक्रम भारतीय क्रिकेटमध्ये, पुढे २५ वर्षानंतर, विश्वनाथने मोडेपर्यंत अबाधित होता! यानंतर भारताच्या दौऱ्यावर आलेल्या बलाढ्य वेस्ट इंडिज विरुध्द आणि त्यानंतर १९५१-५२ मध्ये इंग्लड- पाकिस्तानविरुद्ध मिळून आणखी पाच शतके हजारेनी झळकावली. पण तरीसुद्धा क्रिकेटच्या माहेरघरी म्हणजे खुद्द अिग्लंडमध्ये शतक झळकवण्याची त्यांची महत्वाकांक्षा अपुरीच राहिली! पण वस्तुस्थिती अशी होती की आयुष्यातील आठवावेत, नव्हे सतत आठवावेत असे काही संस्मरणीय डाव, हजारे याच अिंग्लंडच्या १९५२ च्या दौऱ्यावर खेळले. खऱ्या अर्थाने 'कॅप्टन्स इंनिग्ज'! आता ते खाजगी जीवनातही बडोदे संस्थानात कॅप्टनच्या हुद्यावर होते आणि भारतीय टीमचेहि ते कॅप्टन होते! आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अिंग्लंडमधील त्यांचे शतक हुकले ते फक्त ११ धावानी! पहिल्याच लॉर्ड्सवरील कसोटीत भारताची पहिल्या डावात घसरगुंडी अडाली. तीन विकेट्स् चाळीशीतच गेल्यावर हजारेना, नवीन तरुण खेळाडू विजय मांजरेकरची जोड मिळाली. बेडसर, टूमन आणि लेकर बहरात असताना अत्यंत सावधगिरीने खेळून दोघानी २२२ धावांची भर घातली. मांजरेकरचे शतक(१३३) लागले; दुर्दैवाने हजारे ८९ धावावरच बाद झाले. पण केविलवाण्या दिसणाऱ्या धावसंख्येला त्यानी आपल्या झुंझार खेळीने बऱ्यापैकी आकार दिला होता. पण खरी नामुष्की त्याच कसोटीच्या दुसऱ्या डावात झाली होती. धावफलकावर शून्य धावा असं दृष्य असताना पहिला गडी बाद झाला. दुसरा गेला. तिसरा गेला. आणि चौथी विकेटहि गेली. पहिल्या डावातील प्रदीर्घ इनिंग हजारेंची खेळून झाली होती. त्यामुळे पायाला जखम झाली होती. ड्रेसिंगरुममध्ये पायाला मसाज चालू होता. नेहमीच्या चौथ्या क्रमांकाऐवजी, हजारे पायाच्या जखमेमुळे सहाव्या क्रमांकावर खेळणार होते. ४ बाद शून्य अशा अत्यंत लाजिरवाण्या स्कोअरवर खेळायला जाणे कोणत्या कर्णधाराला आवडेल? अलेक बेडसर आणि फ्रेडी टूमन, ही इंग्लिश शीघ्रगती गोलंदाजांची जोडी, मैदानावर धुमाकुळ घालत होती. हजारेनी आपला मसाज आवरला. दुसऱ्या पायावर पॅड्स बांधले. टूमन हातात चेंडू घेऊन 'स्वागताला ' अभा होता तो स्वतःची हॅटट्रिक पुरी करण्यासाठी. हो हॅटट्रिक! पहिल्या डावात सांगली आणि सांगलीकर.. ..१९०