पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

क्रिकेटच्या दुनियेचा अनभिषिक्त सम्राट असं ज्याचं वर्णन करता येईल अशा ब्रॅडमनच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणं म्हणजे वाघाबरोबर शेळीची झुंज असाच प्रकार होता. ब्रॅडमन, पान्सफोर्ड, हॅसेट असे जगद्विख्यात फलंदाज. ताशी ९० मैलाच्या भन्नाट वेगाने अंगावर धावून येणारी लिंडवाल- मिलर ही तुफानी गोलंदाजांची जोडगोळी. जॉन्स्टन, टोरॉक यासारखे मंदगती गोलंदाज. अशा ताफ्यासमोर अभं राहण्याचीच मारामार. अपेक्षेप्रमाणे भारतीय संघाने सपाटून मार खाल्ला. पण या पराभवातील रुपेरी किनार म्हणजे हजारेंची अॅडेलड कसोटीमधील एकाच मॅचमधील दोन डावातील दोन शतके. आजच्यासारखी हेलमेट्स, थाय- पॅड्स, रिस्ट बँड्स असे 'संरक्षक' अपाय नसताना, लिंडवाल - मिलरच्या बंपर्सपुढे, विजय हजारेनी वयाच्या ३२ व्या वर्षी ११६ धावा काढून पहिलंवहिलं कसोटी शतक ठोकलं! अमरनाथ, मनकड यासारखे प्रथितयश खेळाडू नामोहरम होत असताना आणि डोळ्यासमोर ऑस्ट्रेलियाने दोन दिवस दमवून ६७४ धावांचा डोंगर अभा केला असताना, कुणीह गर्भगळीत झाला असता तर ते स्वाभाविकच होते. त्यातून हजारेंच्या मनाचे दडपण वाढवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे प्रेक्षकांमध्ये त्यांचे क्रिकेटमधील दुसरे गुरू ग्रिमेट सामना बघत प्रेक्षकांत अपस्थित असल्याची जाणीव ! अशा परिस्थितीत त्याना धीर मिळाला, स्फूर्ती मिळाली ती त्यावेळी क्रिकेट कसोटीत नव्यानेच पदार्पण करत असणाऱ्या दत्ता फडकर या तरुण आणि दमदार खेळाडूकडून फडकरांचा हा पहिलाच परदेश-दौरा आणि तिसराच कसोटी सामना. लिंडवाल- मिलरसमोरच्या त्यांच्या बेडर खेळाने हजारेना नव्याने अमेद आली. सहाव्या विकेटसाठी फडकरबरोबर १८८ धावांची भागीदारी करुन हजारेनी आपलं पहिलं शतक (११६) झळकावलं. पाठोपाठ फडकरानी पण आपलं शतक (१२३) साजरं केलं. अर्थात् तरीसुद्धा फॉलोऑनची नामुष्की टळली नव्हतीच. दुसऱ्या डावात सात भारतीय खेळाडूना तर भोपळाहि फोडता आला नव्हता! खेळपट्टी झिजत जाऊन गोलंदाजाना अनुकूल बनत चालली होती. पण यशासारखं यश नाही हेच खरं! पहिल्या डावातील शतकामुळे हजारेंचे हात शिवशिवत होते. आणि भारतीय क्रिकेट कसोटीच्या अितिहासामधील एक सोनेरी पान अघडलं ! हजारेनी त्याच सामन्यातील, फॉलोऑननंतरच्या, दुसऱ्या डावात पुन्हा शतक (१४५) झळकावलं ! कसोटी सामन्यातील प्रत्येक डावात शतक! आणि ते सुद्धा सर्वथैव प्रतिकूल परिस्थितीत. अशी घटना कसोटी क्रिकेटमध्ये एरवीसुद्धा दुर्मिळ. भारतीय क्रिकेटमध्ये सांगली आणि सांगलीकर.. १८९