पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यांच्या क्रिकेट जीवनात त्याना अवघे ३०च कसोटी सामने खेळायला मिळाले. तेवढ्यातहि त्यानी सात शतके आणि नऊ अर्धशतके फडकावली; आणि ४७.६५ च्या सरासरीने २१९२ धावा काढल्या. आणि हे सर्व केव्हा? तर वयाची एकतिशी अलटल्यानंतर ! तेव्हा मनात सहजच विचार डोकावतो की कसोटी सामने जर हजारेना ऐन बहरात असताना आणि २१ ते ३१ या क्रिकेटमधील 'तारुण्यात' मिळाले असते तर चित्र किती वेगळे दिसले असते? पण गंमत म्हणजे कसोटी क्रिकेटची आकडेवारी तुलनात्मक दृष्ट्या कमी असूनहि सगळं क्रिकेटजगत् त्याना एक अव्वल दर्जाचे फलंदाज मानते. ते कशामुळे? त्यांचं खेळण्याचं तंत्र विलक्षण शास्त्रशुद्ध होतं. काही तरी वेडेवाकडे फटके मारुन विकेट फेकलीय असं दृष्य त्यांच्या २२ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत एकही सांपडणार नाही. सर्व प्रकारचे फटके त्यांच्या भात्यात होते. कट, पुल, क्वचित प्रसंगी हुक, असले शॉटस् मारणाऱ्या विजय हजारेंचे खरं वैशिष्टय होतं ते त्यांच्या नजाकतदार कव्हर ड्राईव्हज् आणि ऑन ड्राइव्हज्मध्ये ! पण क्रिकेट कसोटीमध्ये ते ओळखले जातात ते त्यांच्या विलक्षण एकाग्रतेबद्दल ! त्याना Mr. Concentration म्हणूनच ओळखले जायचे. त्यांच्या Concentration, Dedicaton आणि Determination या तीन वैशिष्ट्यांची ओळख करुन घेण्यासाठी त्यांची कसोटी कारकीर्दच पहावयास हवी. वर अल्लेख केल्याप्रमाणे हजारेना वयाच्या ३१ व्या वर्षी म्हणजे १९४६ मध्ये पहिली कसोटी खेळायला मिळाली आणि ती सुद्धा अिंग्लंडमध्ये. क्रिकेटच्या मक्केतच. खुद्द लॉर्डस्च्या मैदानावर. पण इतर सामन्यात, म्हणजे भारतातील, धावांचा धो धो पाऊस पाडणारा हा वीर, तिन्ही कसोटी सामन्यात नेत्रदीपक कामगिरी करु शकला नाही. इंग्लडमधील ओलसर हवामानात आणि बेभरवंशाच्या खेळपट्ट्यांवर खेळण्याचे तंत्र त्याना जमले नाही हे खरे! त्याना गोलंदाजीचा मोठाच भार वहायला लागला आणि स्वाभाविकच त्याचा परिणाम त्यांच्या फलंदाजीवर झाला. पण अिंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात शतक झळकवता आले नाही हे शल्य कायमचे त्यांच्या मनात राहिले ते राहिलेच. (दुर्दैव म्हणजे १९५२ मध्ये झालेल्या दौऱ्यात पण त्याना ते जमलं नाही ! ) पण त्याचे सव्याज अट्टे, त्याना १९४७ च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात काढायला मिळाले. सांगली आणि सांगलीकर. ..१८८