पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

झाली. प्रो. दि. ब. देवधरांच्या आग्रहाने हजारे महाराष्ट्राकडून खेळले. पण नंतर अचानक नोकरीनिमित्ताने त्याना बडोदा येथे जायला लागले. नोकरीची सोय महाराष्ट्रात मनासारखी न झाल्याने त्याना बडोद्याला जाणे भाग पडले. प्रो. देवधराना जितकं वाईट वाटलं तितकंच हजारेना महाराष्ट्र सोडताना वाईट वाटले. एका मुलाखतीमध्ये त्यावेळी त्यानी हताशपणाने म्हटलं होतं की, “मी कोठे रहावयाचे व कुणाकडून खेळायचे हे माझ्या परावलंबी परिस्थितीवर अवलंबून राहिल. " त्यानंतर बडोद्यात त्यानी अनेक रणजी सामने आपल्या फलंदाजीने गाजविले. त्याकाळात विजय मर्चंट आणि विजय हजारे फलंदाजीत एकमेकांवर कुरघोडी करण्याचे जिद्दीने प्रयत्न करीत. दोघांची स्पर्धा निकोप होती. वर्तमानपत्रवाले मात्र निष्कारण मर्चंट श्रेष्ठ ? की हजारे श्रेष्ठ ? असे वादंग मुद्दाम माजवून देत. १९३९ च्या बडोद्याविरुध्दच्या रणजी सामन्यात विजय हजारे यानी नाबाद ३१६ धावा काढल्या. यावर विजय मर्चंट यानी ३५९ नाबाद असा डोंगर रचून हजारेंचा विक्रम मोडला. १९४३ च्या पंचरंगी सामन्यात हजारेनी २४८ धावा काढल्या. पुढच्याच सामन्यात २५० धावा काढून मर्चंटनी सरस जवाब दिला. अशा चकमकी सतत दोघात झडत; त्यामुळे दोघांचाहि खेळ अंचावला ही भारताच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट. रणजी करंडक सामन्यात हजारेनी एकूण ६३१२ धावा काढल्या. त्यात तब्बल २२ शतके आहेत. हजारे वयाच्या १८व्या वर्षापासूनच क्रिकेटमधील प्रथमश्रेणीचे सामने खेळले. एकूण ३२९ डावांमध्ये ५६.२२ च्या अभिमानास्पद सरासरीने त्यानी १६१९४ धावा फटकावल्या. 'युद्धस्य कथा रम्य' तशा क्रिकेटमधील पराक्रमांच्या कथा विलक्षण रोमांचकारी आहेत. हजारेंच्या क्रिकेट जीवनात अशा खूप कथा आहेत. त्यातील १९४३ -४४ च्या मोसमातील पराक्रम विलक्षणच. पंचरंगी सामन्यातील लढतीमधला हिंदू विरुद्ध रेस्ट असा सामना मुंबईला चालला होता. हिंदू संघ बलाढ्य ताकदीचा होता. जवळ जवळ टेस्ट टीम ठरावी असा तो संघ. अपेक्षेप्रमाणे त्यानी ५ बाद ५८१ धावा केल्या. हजारेंचा या आधीचा २४८ धावांचा विक्रम मोडायचा, या निर्धाराने विजय मर्चंटनी तो मोडून स्वतःच्या २५० धावा झाल्यावर आपल्या संघाचा डाव घोषित केला. आता रेस्ट संघ कसा टिकाव धरतो याकडे सर्वांचे लक्ष होते. पण रेस्ट संघाच्या अवघ्या १३३ धावा झाल्या. त्यात हजारेंच्या होत्या ५९. फॉलोऑननंतर रेस्ट संघाचा दुसरा डाव असाच गडगडला. ५ बाद ६०. म्हणजे आता डावाचा पराभव अटळ होता. एका बाजूने विजय हजारे 'चिकटून' खेळत होते आणि हताशपणे दुसऱ्या बाजूला पडणाऱ्या सांगली आणि सांगलीकर... ..१८६