पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आज कुणाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल पण विजय हजारे अत्तम फुटबॉल खेळत असत. फुटबॉलपटू म्हणून पुढील आयुष्यात चांगलं नाव कमावलं असतं. पण करीअर करायचा प्रश्न आला तेव्हा त्यानी क्रिकेटची निवड केली. कारण ज्या सांगली हायस्कूलमध्ये ते शिकत होते तिथं हणमंतराव भोसले (सुप्रसिद्ध क्रिकेटपटू विजय भोसले यांचे वडील) नावाचे क्रीडा शिक्षक होते. त्यानी हजारेंचे सुप्त गुण अचूक हेरले. त्यानी सुरुवातीपासूनच हजारेंच्या खेळाकडे लक्ष पुरवले. क्रिकेटमधील अनेक बारकावे शिकवले. “तुझ्याकडून माझ्या फार अपेक्षा आहेत” असं ते म्हणत. खुद्द हजारेंचे वडील क्रिकेटप्रेमी होते. त्यामुळे हजारे फुटबॉलऐवजी क्रिकेटकडेच वळले. एका स्थानिक सामन्यात एक खेळाडू कमी पडत होता. हजारे प्रेक्षक म्हणून आपल्या सवंगड्यांबरोबर तेथे होते. आयत्या वेळेला त्याना संघात घेण्यात आले. त्या सामन्यात त्यानी शतकच ठोकले. त्या पराक्रमाचं कौतुक म्हणून वडिलानी एक बॅट हजारेना घेऊन दिली. पुढे आयुष्यात पदकांची, सन्मानांची रासच्या रास लागली, पण वडिलानी केलेल्या पहिल्या-वहिल्या सन्मानाचं आणि प्रोत्साहनाचं अप्रूप काही विलक्षणच होतं. सुदैवाने हजारेंचं क्रिकेट - नैपुण्य देवास संस्थानचे युवराज विक्रमसिंह यांच्या लक्षात आलं. ते स्वतः त्यावेळी कोल्हापुरात राजाराम हायस्कूलमध्ये शिकत होते. त्यानी आग्रहाने हजारेंना आपल्या समवेत नेलं आणि पुढं देवासचे अधिपती बनल्यावर त्यानी हजारेना आपलं ए. डी. सी. बनवून टाकलं. आर्थिक विवंचनेतून मुक्त झाल्यामुळे हजारेना क्रिकेटवर संपूर्ण लक्ष केंद्रित करता आलं. लौकरच प्रथम श्रेणीच्या क्रिकेट सामन्यात खेळण्याची संधी हजारेना प्राप्त झाली. एम्. सी. सी. चा अधिकृत संघ जॉर्डिनच्या (होय, तोच बॉडीलाईनवाला प्रकरणातील कुप्रसिद्ध जॉर्डिन) नेतृत्वाखाली १९३३ - ३४ साली आला. पुणे येथे होणाऱ्या दोन दिवसाच्या सामन्याकरता तरुण हजारेंची निवड झाली. त्यावेळी सांगली- कोल्हापूर भागात ही घटना एवढी अपूर्व मानली गेली की हजारे पुण्याला जायला निघाले तेव्हा त्याना शुभेच्छा देण्यासाठी अलोट गर्दी जमली! आश्चर्य म्हणजे पुढे जगविख्यात फलंदाज म्हणून गाजलेले हजारे, पहिल्या सामन्यात गोलंदाज म्हणून गाजले. प्रत्येक षटकात एक बळी असा खाक्या ठेवीत त्यानी चार षटकांत चार विकेट्स घेतल्या. १९३३ मध्ये विश्वविख्यात क्रिकेटपटू रणजी यांचे निधन झाले. त्यांचे चिंरतन स्मारक म्हणून रणजी करंडक मॅचेस सुरु झाल्या. विजय हजारेना महाराष्ट्रातर्फे खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यानी ६५ धावा काढल्या आणि ६ विकेट्स सांगली आणि सांगलीकर. ..१८४