पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

क्रिकेटपटू विजय हजारे जुन्या जमान्यात षटकारांचे बादशहा म्हणून प्रख्यात असलेले कर्नल सी. के. नायडू कर्णधार असतानाची गोष्ट. एक सामना चालू असताना, संध्याकाळी एक समारंभ होता. सी.के.नी आपल्या सर्व खेळाडूंची ओळख करुन दिली. पण एका खेळाडूची ओळख करुन द्यायची राहिली. सर्वानी गिल्ला केला. तेव्हा त्यानी एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले की " माझा एक मित्र इंग्लंडमध्ये आहे. त्याचे मोठे दुकान आहे. पण दुकानावर नावाची पाटी नाही. लोकांनी अनेकवेळा विचारलं की, दुकानावर नावाची पाटी का नाही? तो प्रत्येक वेळा अत्तर देई, 'पाटी लावायची गरजच नाही. न लावताच माझं दुकान सर्वाना माहीत आहे.' तसं मी 'ओळख' करुन न दिलेल्या खेळाडूचं आहे. " त्या खेळाडूचं नाव होतं, 'विजय हजारे' ! हजारेनी हातातून बॅट ठेवून दिली, त्या गोष्टीला आता जवळजवळ चाळीस वर्षं अलटून गेली. पण आजच्या घडीला सुद्धा त्या विक्रमवीराचं नाव निघालं की आजचे बुजुर्ग खेळाडू कानाला हात लावून कुर्निसात करतात! त्यांच्या खेळातील विलक्षण एकाग्रतेबद्दल आणि फलंदाजीतील नैपुण्याबद्दल आदरानं बोलतात. एके काळी विजय हजारे ही एक दंतकथा बनली होती. विजय हजारे हे एक विशेषणच बनलं होतं. गजाननराव वाटवे म्हणजे भावगीत क्षेत्रातील 'विजय हजारे' आहेत असं म्हटलं जाई. प्रा. ना. सी. फडके तर बालगंधर्वांशिवाय स्वयंवर नाटक म्हणजे विजय हजारेंशिवाय क्रिकेट मॅच असं म्हणत असत. असे हे विजय हजारे सांगलीचे सुपुत्र आहेत. ज्यांच्यामुळं सांगलीचं नाव जगभर गाजलं, त्या विजय हजारेंचा जन्म ११ मार्च १९१५ रोजी सांगली गावात झाला. त्यांचे वडील सॅम्युअल हजारे हे सांगलीच्या मिशन स्कूलमध्ये शिक्षक होते. एकूण आठ भावंडांमध्ये विजय आणि त्यांचे धाकटे बंधू विवेक या दोघानाच क्रिकेटची आवड लागली. (त्या दोघांची मूळ नावे विजयानंद आणि विवेकानंद अशी लांबलचक होती.) सिटी पोस्टाच्या समोरील सिव्हील हॉस्पिटलच्या आवारात त्यांचं बालपण गेलं. 'गल्ली' क्रिकेटचे पहिले वहिले धडे त्यांनी तिथंच गिरवले. सांगली आणि सांगलीकर... .१८३