पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सरकारकडून अॅवॉर्ड मिळाले. त्यांच्या लेखनाप्रमाणे त्यांचे वक्तृत्वही प्रभावी होते. आयुष्यभर हिंदू-मुस्लिम सलोख्याचा ध्यास घेणाऱ्या या सत्पुरुषाचा मृत्यू, अपघाती मृत्यू, सर्वाना चटका लावून गेला. एस. टी. महामंडळात काम केलेल्या अमीनसाहेबानी, काळाची गरज ओळखून, अनेकांचा विरोध असतानाही सांगली-मिरज, सिटी बस सर्व्हिसचा आग्रह धरला होता. त्या कल्पनेची गोड फळे आपण चाखत आहोतच. (ही योजना सर्वाना सोयीची तर झालीच झाली, पण सरकारलाही अतिशय फायद्याची ठरली.) पण खुद्द अमीनसाहेबाना मात्र ती कल्पना चांगलीच भोवली. कारण ज्या सांगली-मिरज सिटी बस - सर्व्हिस कल्पनेचा त्यानी पाठपुरावा केला, त्याच सिटी बसचा धक्का लागून १७ डिसेंबर १९७३ रोजी त्यांचे ६८ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. किती विचित्र हा देवाघरचा न्याय ? आजच्या स्फोटक परिस्थितीत अमीनसाहेबांसारख्या राष्ट्रीय बाण्याच्या व्यक्तिमत्वाची नितांत आवश्यकता आहे. सांगली आणि सांगलीकर... ..१८२