पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यानी आनंद मानला. नेहरू सदरा, पायजमा आणि गांधी टोपी हा त्यांचा कायमस्वरूपी पोशाख असे. आपल्या साध्या, वाकून जावे लागणाऱ्या साध्या घरातच त्यानी संपूर्ण आयुष्य हसतखेळत व्यतीत केले. , तथापि त्यांनी फार मोठे वैभव प्राप्त केले ते साहित्यलक्ष्मीचे. साहित्यसेवेतून समाजकारण हे ब्रीदवाक्यच त्यानी बहुधा स्वतःच्या मनावर कोरले असावे. त्यांची एकूण १६ पुस्तके प्रकाशित झाली. संशोधनात्मक चरित्रे आणि चिंतनीय धार्मिक साहित्य अशी मराठी साहित्याला त्यांची मोलाची देणगी आहे. मुस्लिम म्हणवणाऱ्या अनेकांना अर्दूचे ज्ञान नसते, तेव्हा इस्लाम धर्माची ओळख यथार्थपणे त्याना व्हावी, त्याचबरोबर रोजच्या रोज ज्यांच्यांशी संबंध येतो, त्या बिगर-मुस्लिमानाही व्हावी, या हेतूने त्यानी जाणीपूर्वक मराठी भाषेत आपले लेखन केले. 'इस्लाम', 'इस्लाम आणि नीतिशास्त्र' 'इस्लाम आणि संस्कृती' अशा त्यांच्या पुस्तकांमुळे, इस्लामधर्माची चांगली ओळख, त्यांच्या ज्ञातिबांधवांना, तशीच इतरजनांनाही झाली. त्यांच्या अवतीभोवती वावरणाऱ्या दोन्ही जमातीमधील समज-गैरसमज, अमीनसाहेबाना चांगले माहित असल्यामुळे, त्यानी, "हिंदु मुस्लिमांचा सांस्कृतिक मिलाफ" हा समतोल विचारांचा ग्रंथ लिहिला. अमीनसाहेब खऱ्या अर्थाने, एक सच्चे धार्मिक मुसलमान होते. आपल्या धर्माचा त्याना रास्त अभिमान होता. त्याचबरोबर हिंदू धर्मातील अच्च सांस्कृतिक मूल्यांचे त्याना प्रेम होते. असेच शुद्ध प्रेम आपल्या बांधवानाही वाटावे म्हणून 'प्राचीन भारतीय संस्कृति' हा ग्रंथ त्यानी लिहिला. या पुस्तकाचे विचारवंतांकडून खूप स्वागत झाले. शिवाजी विद्यापीठाने तर आपल्या अभ्यासक्रमात त्याचा अंतर्भाव केला. हिंदु-मुस्लिमाना, परस्परांमधील चांगल्या गोष्टी कळाव्यात म्हणून अमीनसाहेबानी, 'ऐतिहासिक हिंदी मुसलमान', 'प्रसिद्ध हिंदी मुसलमान,' 'भारतीय शूर स्त्रिया' अशी पुस्तके लिहिली. याव्यतिरिक्त त्यानी लिहिलेली 'अतातुर्क कमाल पाशा', 'हजरत महंमद पैगंबर’, ‘सम्राट अकबर' ही चरित्रे खूप लोकप्रिय झाली. याहून अमीनसाहेबांचे कौतुक म्हणजे त्यानी लिहिलेले 'महापुरुष छत्रपती शिवाजी' हे चरित्र ! त्यांच्या थोरवीचा वेधक परिचय करुन देत, ज्या धर्मनिरपेक्षतेने त्यानी राज्य केले, दोन्ही, हिंदू-मुस्लिम जमातीना समान वागणूक दिली, मंदिराबरोबरच मशिदीला संरक्षण दिले, या गोष्टी अधिक परिणामकारकतेने अमीनसाहेबानी सांगितल्या आहेत. साधी पण वेधक, रसाळ भाषा, समतोल विचारसरणी, अभ्यासू वृत्ती ही अमीनसाहेबांची लेखन - वैशिष्ट्ये होती. त्यांच्या अनेक पुस्तकांना पारितोषिके मिळाली. त्यांचे आणखी कौतुक म्हणजे ही सगळी पुस्तके त्यानी कुणा प्रकाशकाच्या मागे न लागता, स्वतः कष्टपूर्वक प्रकाशित केली. वरील सर्व पुस्तकांची निर्मिती विशिष्ट ध्येयाने केली. याव्यतिरिक्त त्यानी 'अबला' नावाची एक कादंबरी लिहिली. त्या पुस्तकाला भारत सांगली आणि सांगलीकर... ...................१८१