पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सय्यद अमीन - एक सालस व्यक्तिमत्व बाबरी मशीद, मुंबईतील बाँबस्फोट मालिका, त्यावेळी असळलेल्या भयानक दंगली, हिंदु-मुसलमान समाजातील कधीच नष्ट होणार नाही असं वाटावयाला लावणारी तेढ, हे सारं बघितलं की सांगलीत होऊन गेलेल्या एका संत प्रवृत्तीच्या विभूतीची आठवण येते. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार, त्या व्यक्तीने आपल्या वाणीने आणि लेखणीने, आयुष्यभर केला. त्या सत्पुरुषाचे नाव सय्यद अमीन. पैगंबरवासी सय्यद अहंमद अमीन यांचा जन्म १९०५ सालचा. त्यांचे शालेय शिक्षण सांगली हायस्कूलमध्ये झाले. अमीनसाहेबांच्या भाषणात, लेखनात, अनेक संस्कृत अवतरणे येत. ठायीठायी त्यांचे संस्कृत भाषेतील प्रभुत्व दिसून येई त्याचे मूळ या शालेय शिक्षणात आढळते. त्या हायस्कूलमधील नामांकित संस्कृत शिक्षक कै. श्रीपादशास्त्री देवधर यांचे ते आवडते विद्यार्थी होते. अमीनसाहेबानी त्यांचे हे ऋण जागोजागी सांगितले आहे. आपले पुस्तक त्यांच्या स्मृतीस कृतज्ञतापूर्वक अर्पण केले आहे. पुढे कॉलेजशिक्षणासाठी अमीनसाहेब सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजात दाखल झाले. तो काळ पारतंत्र्याचा होता. अितर अनेक तरुणांप्रमाणे त्यानाही स्वातंत्र्याची आस लागली होती. त्यापोटी अमीनसाहेबानी, शिक्षण अर्धवट सोडून स्वातंत्र्यसंग्रामात अडी घेतली. शिक्षण अर्धवट राहिले तरी आयुष्यभर त्यांचा व्यासंग चालूच होता. अमीनसाहेबांची सामाजिक कार्याची तळमळ बघून, संस्थानी काळात, त्याना सांगली म्युनिसिपालिटीचे लोकनियुक्त सदस्यत्व, १९३६ ते १९३९ या काळात दिले गेले होते. १९४९ ते १९५२ या काळात ते मुंबई लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे सदस्य होते. १९५४ ते १९६२ या दरम्यान ते पुणे विद्यापीठ कोर्टाचे सदस्य होते. मराठी साहित्य परिषदेचे ते कार्यकारी सदस्य होते तसे पी. ई. एन. (पेन) या आंतरराष्ट्रीय लेखक संघाचेही ते सभासद होते. अखिल भारतीय काँग्रेसचे ते २५ वर्षे क्रियाशील सदस्य होते. वसंतदादा पाटील यांच्याबरोबर त्यांचा चांगला स्नेह होता. तथापि त्यानी राजकारण फार कमी केले. त्यांचा अधिक ओढा समाजकारणाकडे होता. अनेक मानाची पदे भूषवूनही ते स्वतः कमलपत्राप्रमाणे राहिले. कोणत्याही गोष्टीचा वैयक्तिक लाभ अठवावा ही त्यांची वृत्तीच नव्हती, अन्यथा अनेक संधी त्याना अपलब्ध होत्या. लक्ष्मीची अपासना करण्यापेक्षा, सरस्वतीची आराधना करण्यातच सांगली आणि सांगलीकर. १८०