पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्या 'शिव्या' ऐकून ठेवत. भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासंदर्भात ते एकदा म्हणाले होते की “शरीरासारखी भाषा कमवावी लागते, गोटीबंद करावी लागते. कथा लिहायची म्हणजे शब्दांची ताकद फार हवी. नेमक्या शब्दात तुम्हाला वजन पकडायला लागतं. डोक्याचं भुस्कट पडतं." त्यांच्या कथावैशिष्ट्यांचा अहापोह करण्याची ही जागा नव्हे मात्र अधिक जिज्ञासा असणाऱ्यानी वर अल्लेख आलेली दोन पुस्तके अवश्य वाचून पहावीत. पानवलकरांविषयी प्रा. म. वा. धोंड यानी असं म्हटलयं की "त्यांचा डोळा म्हणजे सिनेकॅमेराची लेन्सच. एखाद्या घटनेचे ते कथन करत नाहीत तर चित्रण करतात. " त्यांच्या कथेवरून ‘अर्धसत्य' हा चित्रपट निर्माण झाला. पानवलकराना तेव्हा १९८४ चे अत्कृष्ट कथेचे फिल्मफेअर पारितोषिक मिळाले. प्रसिद्धिच्या झोतात असतानाच, दुदैवाने प्रकृती खालावत जाऊन त्यांचे १९८५ मध्येच दुःखद निधन झाले. त्यांच्या काही अप्रकाशित कथा, ललित लेख, अलिकडेच 'मौज' प्रकाशनाने 'कांचन' आणि 'संजारी' या पुस्तकांद्वारे प्रकाशित केले आहेत. त्यांची स्मृती कायमस्वरूपी जतन करण्याच्या हेतूने, त्यांच्या चाहत्यांनी 'श्री. दा. पानवलकर स्मृति-कथा पुरस्कार' ठेवलेला आहे. गेली १३-१४ वर्षे मराठी कथाकारास हा पुरस्कार दिला जातो. या स्पर्धेचे नियोजन सुरुवातीला साहित्य परिषद्, सांगली करत असे; नंतर हे काम सांगली (जिल्हा) नगरवाचनालयातर्फे केले जात आहे. एका महान कथाकाराची ही छोटीशी कथा ! 000 सांगली आणि सांगलीकर... १७९