पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

‘एका नृत्याचा जन्म’, ‘चिनाब' आणि 'जांभूळ' असे त्यांचे सहा कथासंग्रह १९६३ ते १९८१ च्या दरम्यान प्रसिद्ध झाले. त्यांमध्ये त्यांच्या एकूण ७७ कथा आल्या आहेत. औदुंबर, सूर्य आणि चिनाब या तीन कथासंग्रहांना महाराष्ट्र राज्य पारितोषिके मिळाली होती. 'अभिरूचि ने १९६६ मध्ये आयोजित केलेल्या कथास्पर्धेत, त्यांच्या 'सूर्य' या कथेला दुसरे बक्षिस मिळाले होते. त्याच कथेवर 'अर्धसत्य' हा हिंदीमध्ये गाजलेला चित्रपट निघाला. कथेचा चित्रपट होईपर्यंत जे जे म्हणून पानवलकरांच्या अनुभवास आले त्यावर आधारित ललित लेखन त्यानी 'शूटिंग' या पुस्तकात केले आहे. हे त्यांच्या जीवनातील प्रकाशित झालेले शेवटचे पुस्तक. याखेरीज लेख, चर्चा, एकांकिका अशा स्वरूपाचे स्फुट लेखन पानवलकरानी महाराष्ट्र टाइम्स, किर्लोस्कर, ललित, सत्यकथा, लोकसत्ता आदि नियतकालिकांमधून केलं होतं. नाटक, एकांकिका, कादंबरी, काव्य या अितर साहित्य प्रकारांमध्ये त्यानी फारशी मुशाफिरी केली नाही. त्यांची एक एकांकिका ( खबर) सत्यकथेत प्रसिद्ध झाली होती. नाना फडणीस यांच्या जीवनावर नाटक लिहण्याचे त्यांच्या मनात होते. पण तो मनसुबा कागदावरच राहिला. मात्र त्यांच्या एकूण लेखनशैलीला, कादंबरीचा फॉर्म चांगला हाताळता येईल असे अनेकाना वाटे. सुप्रसिध्द नाटककार विजय तेंडूलकर, ज्येष्ठ समीक्षक प्रा. म. द. हातकणंगलेकर, प्रा. श्री. पु. भागवत यासारख्या त्यांच्या चाहत्या मित्रांनी, पानवलकराना वेळोवेळी कादंबरी लेखनाचा आग्रह केला होता. खुद्द पानवलकरानी एका कादंबरीचा आराखडा मनाशी निश्चित केला होताच. सांगली संस्थानच्या राजघराण्यातील अंतर्गत घडामोडींची त्याना चांगली माहिती होती. त्या विषयावर ते लिहिणार होते. ही कादंबरी पुरी झाली असती तर त्यांच्या सर्व लेखनगुणांचे सम्यक दर्शन त्यामध्ये झाले असते. शिक्षकी वा प्राध्यापकी पेशामध्ये नसतानाही, पानवलकरानी आपलं साहित्यप्रेम जागृत ठेवलं. स्वत:मधील लेखक सजग ठेवला हा त्यांच्या गौरवाचा भाग आहे. वाङ्मयाशी अर्थाअर्थी काही संबंध नसलेल्या कस्टम खात्यात नोकरी करुन त्यानी दर्जेदार कथा लिहिल्या ही गोष्ट विलक्षण आहे. संस्कृत भाषेवरील प्रभुत्वामुळे, त्या भाषेतील खजिना त्यानी धुंडाळला असेलच, पण साध्या एस. टी. च्या प्रवासातसुद्धा त्यांच्यामधील लेखक जागा असे. अशा एका प्रवासात दोन खेडुतांचा चाललेला संवाद ते लक्षपूर्वक ऐकत होते. एकजण दुसऱ्याला आपल्या कर्मकटकटी सांगताना म्हणाला, “गेल्या महिन्यात कुणाचं पैसं येळेवर आलं न्हाई. आपली देणी तर चुकत न्हाईत. इचार करुन करुन पार कल्हई झाली डोस्क्याची." पानवलकरानी मनाशी लागलीच नोंद केली की चिंतातूर परिस्थितीला नाव 'डोक्याची कल्हई'!. मुंबईतील माथाडी कामगार एकमेकांत शिवीगाळ करत भांडत असत, तेव्हा पानवलकर लक्षपूर्वक सांगली आणि सांगलीकर....... ...१७८