पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धीरगंभीर वातावरण, नदीकाठ, घाटाच्या पायऱ्या, असं बालपणात बघितलेलं जीवन, त्यांच्या 'हुंकार' सारख्या कथांमधून प्रत्ययकारीपणानं प्रकटलेलं आहे. एवंच काय, पानवलकरांच्या वाङमयीन जीवनकथेचा प्रारंभ, जरी ते मुंबईला गेल्यावर झाला असला, तरी त्यांची मानसिक जडण-घडण सांगलीतच झाली होती. सांगलीच्या शालेय जीवनात, केशवराव दीक्षित यांजसारख्या मातब्बर संस्कृत पंडितांकडे केलेलं संस्कृतचं अध्ययन त्याना आयुष्यभर पुरलं. नोकरीत सुस्थिर होण्यापूर्वी काही काळ ते संस्कृतच्या शिकवण्या करुन अदरनिर्वाह करीत. पानवलकरांना जसा सांगलीचा वारसा, वाङमयीन जीवनात अपयोगी पडला तसं मोठं 'घबाड ' त्याना कस्टमच्या नोकरीत मिळालं! त्यांच्या कथांची अनेक पात्रे आपसूक त्यांच्याकडे चालत आली. या नोकरीत आडमाप आयुष्य जगणारी, अनेक राकट, रासवट, दणकट तशीच खबरदार चलाख माणसं, त्याना जवळून अनुभवायला मिळाली. नोकरीत त्याना मिळालेलं हे घबाड कथालेखनासाठी फार अपकारक ठरलं. अर्थात कस्टममध्ये अनेक लोक असतात; पण अशा अनुभवांना शब्दबद्ध करुन वाङ्मयात चिरंतन करण्याचं सामर्थ्य असणारा एखादाच म्हणून तर पानवलकरांचं कौतुक. याबरोबरच पानवलकरांना त्यांची स्वतःची कलासक्त वृत्ती, लेखक म्हणून सुप्रतिष्ठित करायला अत्यंत अपकारक झाली. त्याना अभिजात संगीताची आवड होती. अनेक मैफली ऐकून, त्यानी नुसतीच आपली श्रवणभक्ती जोपासली नाही तर शास्त्रीय संगीतातील बारकावे जाणून ते शब्दबध्द करण्याचे सामर्थ्य अंगी बाणवलं; त्यामुळेच त्यांच्या आवडत्या कुमार गंधर्वावर ते 'शंकरा' सारखा लेख, अधिकारवाणीनं लिहू शकले. इंद्राणी रहमानच्या नृत्याचा कार्यक्रम बघून, त्या बेहोशीतच, 'एका नृत्याचा जन्म’यासारख्या विलक्षण कल्पना-विलास असणाऱ्या त्यांच्या कथेचा जन्म झाला. पानवलकराना क्रिकेटचं फुटबॉलचं पण वेड होतं. ब्रॅडमनसारखा विश्वविख्यात खेळाडू त्याच्या ऑस्ट्रेलिया-इंग्लंड अशा प्रवासकाळात काही तासच मुंबईच्या विमानतळावर थांबणार होता. तेव्हा त्याला नुसतं काचेतून बघण्यासाठी, पानवलकरानी जिवाचा केवढा आटापिटा केला होता! अशा विविध प्रकारच्या आवडींमुळे, पानवलकरांमधील ललित लेखक चांगला जोपासला जात होता. पानवलकरांची पहिली कथा 'कवी आणि बादशहा,' १९५० च्या सप्टेंबरमध्ये 'महाराष्ट्र' मध्ये प्रसिध्द झाली होती. कदाचित् त्याच्या पूर्वी लिहिलेल्या, पण अप्रकाशित राहिलेल्या अशा काही कथा असतीलही. पानवलकरांचे कथासंग्रह १९६३नंतर प्रकाशित झाले. 'गजगा,' औदुंबर,' 'सूर्य,' सांगली आणि सांगलीकर.... १७७