पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वाङ्मयात साधारण रुचि असणाऱ्या वाचकाने ज्येष्ठ समीक्षक प्रा. म. द. हातकणंगलेकर यानी संपादित केलेलं " श्री. दा. पानवलकर यांची कथा" हे पुस्तक आणि त्यानीच श्री.जया दडकर यांजबरोबर संपादित केलेलं “श्रीदा पानवलकर" अशी दोन पुस्तके वाचली तरी 'श्रीदा' ही काय विलक्षण 'चीज' होती याची कल्पना येईल. एरवी सर्वसामान्य माणसाला, पानवलकर म्हणजे ज्यांच्या कथेवर 'अर्धसत्य' हा गाजलेला चित्रपट निघाला ते पानवलकर एवढीच त्यांची ओळख असते. पानवलकरांची वाङमयीन जीवनकथा साधारणपणे १९५०च्या आसपास सुरु झाली; म्हणजे नोकरीनिमित्ताने सांगली सोडून मुंबईत आल्यानंतर. वास्तविक लेखनाकडे वळावं अशी पार्श्वभूमी घरात नव्हती. कदाचित संस्कृत भाषेच्या अध्ययनाने लिहिण्याची अर्मी त्यांच्यात निर्माण झाली असावी. जातिवंत कथाकार त्यांच्यात अपजतच असावा. साधीसुधी घटना सांगतानासुद्धा, पानवलकर अशी काही रंगवून सांगत की ऐकणाऱ्याला आपण एखादी कथा ऐकतोय असाच भास व्हावा. मुंबईहून सांगलीला ते नोकरीच्या कालखंडात, भावंडाना भेटावयास आणि घरगुती कामासंबंधात येत. वाटेत कधी अशीर झाला तर एस. टी, घाटाच्या ट्रॅफिकमध्ये कशी अडकली किंवा ड्रायव्हर कसा रड्या होता, यासारख्या क्षुल्लक गोष्टीसुद्धा, एखादी चटकदार कथा सांगावी अशा थाटात पानवलकर रंगवून सांगत. विलक्षण अनुभवाना सामोरं जाताना, त्या त्या घटनेतील थरार, नाट्य त्याना लोभवून जाई. सांगली सोडून मुंबईत नोकरीनिमित्तानं वास्तव्य करावं लागलं, तरी त्यांची सांगलीशी असलेली नाळ कधीच तुटली नाही. सांगलीत आल्यावर, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या गाठीभेटीबरोबरच, ते हौसेने आमराईत जात, तात्यासाहेबांच्या मळ्यात जात आणि तिथल्या नीरव शांततेचा अनुभव घेत. त्यांच्या लहानपणी सांगलीत फूटबाल, क्रिकेटचे वेड मोठ्या प्रमाणावर होते. पानवलकर स्वतः या दोन्ही खेळांचे भोक्ते होते. फूटबॉलचे सामने राजवाड्यातील पटांगणात होत. त्या दंगली पाहूनच आणि त्या खेळातील एक विलक्षण खेळाडू पाहूनच पुढे पानवलकरानी 'बक् अप रावण' ही कथा लिहिली. त्यांच्या लहानपणी, त्यानी सांगलीत अनेक कलंदर व्यक्तिमत्त्वे बघितली. त्या काळच्या सनातनी वातावरणात परजातीतील स्त्री बरोबर लग्न करणारा, हॉटेल काढून, त्यामध्ये मांसाहारी पदार्थ बेधडकपणे ठेवणारा, धाडसी, बेदरकार वृत्ती असणारा, एक बेछूट वृत्तीचा ब्राह्मण, पानवलकरानी बघितला होता. त्या व्यक्तिमत्त्वाला त्यांनी त्यांच्या कथेत चपलखपणे आणलं आहे. सांगलीच्या संस्थानी वातावरणाच्या संदर्भातील, त्यांची 'श्रीमंतांचा वस्तरा' ही कथा गाजली होती. ज्या त्यांच्या 'सूर्य' कथेवरून 'अर्धसत्य' हा हिंदी चित्रपट गाजला, त्यातील करडा पोलिस इन्स्पेक्टर, सांगलीच्या संस्थानी काळात, त्याना जवळून बघायला मिळाला होता. सांगली - हरिपूरच्या देवळातील पूजा-अर्चा, सांगली आणि सांगलीकर... ..१७६