पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सातारा अशा ठिकाणी त्याना नोकरीनिमित्त जावे लागले. पुढे या अबकारी खात्याची काही नोकरमंडळी कस्टमखात्याकडे पाठवण्यात आली. त्यामुळे पानवलकर १९४९ मध्ये मुंबईला गेले.
 कस्टममध्ये गेल्यापासून पानवलकरांचा जीवनक्रमच बदलून गेला. घरच्या जबाबदाऱ्यांच्या जाणीवेमुळे त्यानी लग्न केले नाही. जेमतेम १५ वर्षाचे असताना पितृछत्र हरपले आणि ऐन पंचवीशीतच ते मातृछत्राला पारखे झाले. त्यामुळे अधिकारवाणीने त्यांच्यामागे लग्नाचा तगादा लावणारे कोणी नव्हते. कस्टममधील नोकरीचे स्वरूप असे होते की वेळच्या वेळी घरी परतणे, जेवणे वगैरे गोष्टी अशक्य होत्या. सुरुवातीला माधवाश्रम, नंतर नॅशनल हॉस्टेल, अशा ठिकाणी पानवलकर खोली घेऊन रहात. खानावळीचं जेवण किंवा डबा असा प्रकार असायचा. त्यामुळे मुक्त, स्वच्छंदी जीवनाची त्याना सवय लागली. सवयीने तेच जीवन आवडू लागले! आयुष्यभर कमी-अधिक फरकानं असाच जीवनक्रम राहिला. तरुण वयात शरीर साथ देत होतं. पन्नाशी अलटल्यावर मात्र अनेक तक्रारी सुरु झाल्या. एकटेच रहात असल्याने प्रकृतीत होणारे बारीक-सारीक चढउतार कुणाच्या लक्षात येणे शक्य नव्हते. आजारी पडल्यावर एकटेच हॉस्पिटलमध्ये जाऊन अॅडमिट होत. सांगलीच्या भावंडांना कधी कधी या प्रकारांची कल्पनाही नसे. प्रकृतीच्या कारणामुळेच पानवलकरानी मुदतीपूर्वी नोकरीतून निवृत्ती घेतली. कावीळ झाली होती. मुंबईत सरकारी हॉस्पिटलमध्ये अपचार घेतले. पानवलकरांचा, मित्रमंडळींचा फार मोठा गोतावळा नव्हताच. त्यांच्यावर निस्सीम प्रेम असणाऱ्या काही मित्रांनी, त्याना सरकारी हॉस्पिटल मधून दादरच्या 'शुश्रुषा' या प्रख्यात खाजगी रुग्णालयात ठेवलं. तेथील अपचारांमुळे प्रकृती पुष्कळशी सुधारली. पायावरची सूज अतरली. जखम भरत आली. धूसर झालेली स्मरणशक्ती पूर्ववत् झाली. आपल्या पायांनी ते हॉस्पिटलमधून फिरू लागले. विश्रांतीसाठी त्यांचे बंधू-भावजय त्याना सांगलीत घेऊन आले. पण त्यानंतर पुन्हा प्रकृती खालावतच गेली. दादरच्या 'शुश्रुषा' मध्ये झालेली सुधारणा म्हणजे दिवा विझण्यापूर्वी मोठा व्हावा, अशातला प्रकार होता.
 अखेर १९ ऑगस्ट १९८५ रोजी सांगलीत, आपल्या घरी, आपल्या जन्मगावीच, वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

 ही झाली त्यांची छोटीशी लौकिक जीवनकथा. त्यांची वाङ्मयीन जीवनकथा मात्र फार मोठी आहे, विलक्षण आहे. त्यांच्या लेखनात इतका वेगळेपणा, इतकी अंची कशी आली होती हा एक अभ्यासाचाच विषय व्हावा इतकं त्यांचं लेखन आशयघन आहे. वाङ्मयाच्या अभ्यासकालाच असा शोध घेणे शक्य आहे. मात्र


सांगली आणि सांगलीकर......................................................................... ..१७५