पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जे 'लपते' आहे त्याचा कसून 'शोध' घेणारे !
 अशा या पानवलकरांचा जन्म १३ फेब्रुवारी १९२६ रोजी सांगलीत झाला. फार श्रीमंत नाही पण खाऊन पिऊन सुखी असणाऱ्या, पानवलकर कुटुंबात या श्रीकृष्ण दामोदर पानवलकर यांचं बालपण व्यतीत झालं. पाच-सहा भावंडांच्या कुटुंबामधील श्री. दा. हे नंबर दोनचे. त्यांचे वडील सांगली संस्थानामध्ये मुलकी अधिकारी होते. त्यांचं प्राथमिक शिक्षण सांगलीच्या शाळा क्र. २ मध्ये झालं तर माध्यमिक शिक्षण सिटी हायस्कूलमध्ये झालं. जवळच असणाऱ्या कृष्णा नदीचं, त्याकाळी वारंवार येणाऱ्या महापुराचं आकर्षण श्री. दा. ना. होतं. तसंच तिथं असणाऱ्या तालमीचं पण होतं. सिटी हायस्कूलमधील हुशार विद्यार्थ्यांमध्ये त्यांची गणना होत असे. मात्र त्यांच्यावर खरा प्रभाव होता तो केशवराव दीक्षित या नामवंत संस्कृत शिक्षकाचा.त्यानी जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती' मिळवणाऱ्या अनेक विद्यार्थ्याची परंपराच सांगलीत निर्माण केली होती. पानवलकर हे दीक्षितांच्या आवडत्या विद्यार्थ्यापैकी एक होते. अितके की पानवलकर मॅट्रिकच्या परीक्षेच्या वेळी आजारी असताना, ते स्वतः घरी येऊन त्यांचा संस्कृतचा अभ्यास घेत. त्यानी श्री.दांची या शिष्यवृत्तीसाठी खूप तयारी करुन घेतली होती. थोड्या फरकाने ही प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती श्री. दा. मिळवू शकले नाहीत पण दुसऱ्या क्रमांकाची अकबरनवीस ही शिष्यवृत्ती त्याना मिळाली. या निमित्ताने केलेला संस्कृतचा अभ्यास मात्र त्याना लेखक म्हणून अत्यंत अपयुक्त ठरला. संस्कृत वाङ्मयातील अनेक विलक्षण कल्पनांचा परिपोष पानवलकरानी आपल्या अनेक कथांमधून केलेला आहे.
 पण शालेय जीवनातील पानवलकरांची सुखकारी मार्गक्रमणा अचानकपणे संपुष्टात आली. ते शिकत असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. हा एकूण कुटुंबावर आणि व्यक्तिश: पानवलकरांवर मोठाच घाला होता. कारण पाठोपाठच त्यांचा थोरला भाऊ, ऐन तारुण्यात वयाच्या २१ व्या वर्षीच गेला. त्यामुळे मॅट्रिक झाल्यावर, कुटुंबाची मोठी जबाबदारी त्यांच्या शिरावर पडली. धाकटी चार भावंडे आणि विधवा आई यांची अपजीविका करण्यासाठी कुठं तरी नोकरी करणं त्याना क्रमप्राप्त होतं. एरवी कॉलेजात जाऊन ते संस्कृतचे प्राध्यापक झाले असते.

 त्या दरम्यानच, सांगली संस्थानात तंबाखूसाठी अबकारी खाते अघडण्यात आले होते. पुण्यात गाजलेल्या 'रविकिरण मंडळा' चे एक सदस्य श्री. द. ल. गोखले हे या खात्यात अधिकारी होते. त्यांना पानवलकरांची हुशारी आणि कौटुंबिक जबाबदारी याची जाणीव होती. त्यानी या अबकारी खात्यात पानवलकरांची नेमणूक केली. त्यामुळे घरची जबाबदारी ते यथासांग पेलू शकले. जयसिंगपूर, कोल्हापूर,


सांगली आणि सांगलीकर................................................................... .. १७४