पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जोडप्याचे अप्रूप.
 माणसाला स्वत:साठी किती जमिनीची जरुरी आहे ? टॉलस्टॉयच्या 'त्या' सुप्रसिध्द कथेवरून राजमतीबाईनी स्वतःलाच हा प्रश्न विचारला असावा म्हणून तर त्यानी आपल्या पतीच्या अिच्छेनुरूप, थोडी थोडकी नव्हे तर पावणे दोन लाख चौरस फूट क्षेत्रफळाची जिराईत - बागाईत जमीन, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीस दिली. यातून जे तीन प्लॉटस् बाजूला ठेवलेले होते त्यावर नेमिनाथमंदिर, राजमतिभवन आणि राजमती कॉम्प्लेक्स अशा सांगली शहराच्या देखणेपणात भर टाकणाऱ्या भव्य वास्तू बांधल्या गेल्या. या नेमिनाथमंदिरामुळे विश्रामबागच्या बाजूला जी जैन वस्ती वाढली होती त्यांची सोय झाली एरवी बस्तीसाठी त्याना गावात यावे लागे. राजमती भवन हे तर आता मोठे सांस्कृतिक केंद्र झाले आहे.
 राजमतीबाईंचे सर्वात मोठे काम म्हणजे त्यानी स्थापन केलेला 'श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट' या ट्रस्टच्या माध्यमातून, बौद्धिक, तांत्रिक, कलात्मक शिक्षण देण्याची सोय उपलब्ध करुन देणे किंवा अशा संस्थांना अर्थ सहाय्य करणे, विधवा, परित्यक्ता अशा गरजू महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी व्यवसाय केंद्र सुरू करणे, धार्मिक परीक्षांचे अभ्यासवर्ग, वाचनालय, योगासनवर्ग, संस्कार केंद्र, साहित्यिक, गुणवंत, कलावंत याना प्रोत्साहन देणे, गरजू विद्यार्थ्याना पुढील शिक्षणासाठी परदेश प्रवासासाठी सहाय्य करणे असे या ट्रस्टचे बहुविध अद्देश आहेत. सामाजिक कार्यासाठी समर्पण वृत्तीने काम करणाऱ्या पुरुषांसाठी 'श्री.नेमगोंडा पाटील गौरव पुरस्कार' आणि महिलांसाठी (प्रत्येकी पाच हजारांचा) 'श्रीमती राजमती पाटील' पुरस्कार या ट्रस्टकडून दिले जातात.

 ही सर्वंकष अद्दिष्टे पाहून समाजाच्या सर्व स्तरांच्या विकासाचा हेतू यातून दिसून येतो. जैन समाजाच्या दृष्टीने शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक अन्नतीसाठी या ट्रस्टमुळे एक व्यासपीठच अपलब्ध झाले आहे. या ट्रस्टच्या पुढाकाराने पहिला 'कल्पद्रुम विधान समारंभ' संपन्न झाला. त्यावेळी सुमारे सातशे श्रावक- श्राविकांनी पूजाविधीमध्ये भाग घेतला होता. या ट्रस्टच्या पुढाकारानेच जैन मराठी साहित्य संमेलनाचे पाचवे अधिवेशन १९९० च्या डिसेंबरमध्ये सांगलीत प्रथमच आयोजित करण्यात आले होते. या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी श्रीमती राजमतीबाईंची निवड करण्यात आली होती. त्याप्रसंगी समयोचित भाषण करताना त्यानी सांगलीच्या आर्थिक राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक विकासात 'जैन समाजाचे केवढे मोठे योगदान आहे' हे विविध अदाहरणांद्वारे दाखवून दिले; त्याचबरोबर मराठी भाषेत जैन साहित्याचा प्रसार कमी आहे या वस्तुस्थितीवर नेमके


सांगली आणि सांगलीकर...................................................................... १७१