पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 दरम्यानच्या काळात त्यांचे पती श्री. नेमगौंडदादानी शैक्षणिक क्षेत्रात बरीच कामगिरी बजावली होती. त्यांचे थोरले बंधू बाबगोंडा पाटील जैन समाजाचे धुरीणत्व करत होतेच; खेरीज तत्कालीन सांगली संस्थानात ते ओक लोकनियुक्त मंत्री होते. जैन समाजाला बँकिंगचा आणि शिक्षणप्रसाराचा जणू मूलमंत्रच बाबगोंडा पाटील यानी दिला होता. म्हणून तर त्यानी रत्नाकर बँक आणि 'लठ्ठे एज्युकेशन सोसायटी' स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता. त्यांच्या निधनानंतर नेमगौंडदादानी लठ्ठे एज्युकेशनच्या कामाला पूर्णपणे वाहून घेतले. १९५६साली ते ऑनररी सेक्रेटरी झाले. कै. वसंतदादा पाटील आणि बॅ. जी. डी. पाटील यांच्या सहकार्याने त्यानी संस्थेची सर्वांगीण प्रगती केली. आर्ट्स, कॉमर्स आणि लॉ कॉलेज काढण्याचा धाडसी निर्णय घेतला. धडाक्याने बांधकाम सुरु करुन, टी. के. पाटील या कर्तृत्ववान अिंजिनीयर मित्राच्या सहाय्याने थोडक्या खर्चात पूर्ण केले. या सर्व कामांमध्ये नेमगौंडदादाना राजमतीबाईंची पूर्ण मदत असे. कामाच्या ताणामुळे म्हणा वा अन्य सदस्यांच्या विरोधामुळे नेमगौंडांना मनस्ताप होई, त्यांचा क्षोभ होई तेव्हा राजमतीबाई त्याना सांभाळून घेत; प्रसंगी पदरमोड करुन संस्थेला आर्थिक मदत करीत. ती अभयता संस्थेच्या कार्याशी एवढी एकरूप झाली होती की त्या अभयतानी एक महत्त्वाचा निर्णय घेतला.
 त्यानी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीलाच आपले दत्तक अपत्य मानायचे ठरविले. नाहीतरी त्या अभयताना स्वत:चे अपत्य नव्हते.
 जैन समाजातील परमपूज्य देशभूषण महाराज यांच्या अपस्थितीतच नेमगोंडादादा आणि राजमतीबाईंनी आपली सर्व मालमत्ता लठ्ठे एज्युकेशन सोसायटी आणि बस्ती वगैरे धार्मिक गोष्टींसाठी देण्याचे व्रत घेतले.
 केवढे हे विलक्षण औदार्य ! महाराजानी नेमगोंडदादाना 'भाभाषा' ही सन्माननीय पदवी दिली.
 पण दुर्दैवाने सततच्या कष्टांमुळे, शारीरिक, मानसिक त्रासामुळे नेमगौंडदादांचे प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले. कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाने त्याना पूर्णपणे ग्रासले. मुंबईला टाटा हॉस्पिटलमध्ये फेऱ्या सुरू झाल्या. राजमतीबाईनी अपार कष्ट अपसले. अनेक अपास- तपास केले; पण काही अपयोग झाला नाही. २८ फेब्रुवारी १९७३ रोजी कॅन्सरने नेमगौंडदादांचा अंत झाला.

 विशिष्ट ध्येयवादाने सामाजिक कार्य करण्यात परस्पराना पूरक असलेली जोडपी समाजात असणे दुरापास्तच. त्यामुळेच नेमदौंडा- राजमती यासारख्या


सांगली आणि सांगलीकर.................................................................................... ..१७०