पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रंगभूमीच्या सुवर्णकाळातील निष्ठावंत मानकरी
श्री. गणपतराव मोहिते (मा. अविनाश )



 सांगलीच्या एस.टी. स्टँडकडे जाणाऱ्या रस्त्याला डॉ. बापट बालशिक्षण मंदिरासमोर एक छोटीशी गल्ली काटकोनात फुटते. त्या गल्लीचं नाव फौजदार गल्ली. वाढत चाललेल्या शहराच्या अवाढव्य पसाऱ्यात, कोणाच्या खिजगणतीतही नसलेली ती गल्ली. त्या गल्लीत राहणाऱ्या माणसांना आपल्यापलीकडे काही मोठे 'विश्व' आहे याची कल्पना नाही आणि त्या विश्वाचा धागादोरा आपल्यापर्यंत पोचलेला आहे ह्याची तर तिळमात्र कल्पना नाही !
 आणि अचानक एक दिवस या गोष्टीचा साक्षात्कार झाला !
 १३६७, फौजदार गल्लीच्या छोट्याशा, जुन्या वळणाच्या दगडी घरात एके दिवशी प्रत्यक्ष गानसम्राज्ञी लता मंगेशकरच अवतरली! किती गुपचूप आली तरी चाफ्याचा सुगंध लपणार कसा? रस्त्याने येतानाच कुणा रसिका पुकारा केला “लता बाई आल्यात.” बघता बघता गर्दी जमली. आपल्या गणूमामाना, त्यांच्या कुटुंबियांना, भेटायला म्हणून लताबाई आल्या खऱ्या, पण त्या छोट्या घराला गर्दीने वेढले. काही अत्साही लोक लताबाईंना पहायला म्हणून घरातच शिरले. काही अतिअत्साही मंडळी घराच्या तुळ्यांवर चढली. स्वरसम्राज्ञीला बघण्यासाठी एकच झुंबड अडाली. आता परिस्थिती हाताबाहेर जाणार असे दिसल्यावर लताबाईंनी आपली भेट आवरती घेतली.
 तेव्हा अनेकाना प्रथमच समजलं. आपल्याच गल्लीत राहणारे मोहिते म्हणजेच गणूमामा, जुन्या काळातील प्रख्यात नटश्रेष्ठ गणपतराव मोहिते अर्फ “कुलवधू” वाले मा. अविनाश !
 आजच्या पिढीला, प्रत्यक्ष लतादीदी अितकं मानतात ते गणपतराव मोहिते आहेत तरी कोण असा प्रश्न स्वाभाविकच पडेल तेव्हा त्यांचा जीवनपटच अलगडून बघायला हवा.

 आज नव्वदीच्या घरात असलेले मा. अविनाश म्हणजे जुन्या किर्लोस्करी पद्धतीच्या संगीत नाटकांतून आणि नंतरच्या काळात, 'कुलवधू' धर्तीच्या सुगम


सांगली आणि सांगलीकर............................................................ .१५२