पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ज्या भूमिकेमुळे “नाना फडणीस म्हणजे मामा पेंडसे" असे समीकरणच जनमानसात रुढ झाले, ती नाना फडणिसाची अजरामर भूमिका मामाना मिळाली. ज्या अनुकुलतेमुळे त्यांना औरंगजेबाची भूमिका मिळायला हवी असे केशवराव दाते याना वाटायचे त्याचा आता अपयोग झाला. पल्लेदार आवाज आणि भेदक पाणीदार डोळे, विलक्षण मुद्राभिनय यामुळे मामांचा नाना फडणीस फारच गाजला. या नाटकात नानासाहेब फाटक (राघोबा), गोदुताई वर्तक आणि नंतर दुर्गाताई खोटे ( आनंदीबाई) केशवराव दाते (तुळोजी पवार) पार्श्वनाथ आळतेकर (रामशास्त्री) अशा नाट्यक्षेत्रांमधील दिग्गजांच्या भूमिका होत्या. या सर्वाना टक्कर देऊन आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडायची हे काम सोपं नव्हतं. पण मामानी ते काम लीलया केलं. ही त्यांच्या अभिनय-सामर्थ्याची पावतीच होती. या अत्सवामुळे 'मामा पेंडसे' हे नाव मुंबईकरांपुढे मोठ्या प्रमाणात प्रसिध्दीला आलं.
 आणि मुंबईत प्रसिद्धी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी.
 खरं म्हणजे मामाना असं मोठं यश केव्हाच मिळायला हवं होतं, एवढी त्यांची गुणवत्ता होती. अशी वेळ येईपर्यंत मामा चाळिशीला पोचले होते. आता त्यांची घोडदौड सुरू होणार असं वाटत होतं.
 आणि त्याचवेळी मामांचं पोटदुखीचं जुनं दुखणं फणा काढून अभं राहिलं!
 १९४५ मध्ये ऑपरेशन करावं लागलं. खूप यातना सहन कराव्या लागल्या. ऑपरेशननंतर मामा विश्रांतीसाठी सांगलीस आले. वास्तविक सांगलीच्या एका वैद्याने १९३७ मध्ये मामाना असं काही जालीम औषध दिलं होतं की त्यानंतर सात-आठ वर्षांत पोटदुखी अद्भवली नव्हती. पण एव्हाना त्या वैद्याचं निधन झालं होतं. पुन्हा चार वर्षानी हा त्रास अद्भवला. डॉ. अजित फडकेंची ट्रीटमेंट घेऊन सुद्धा पोटदुखीचा समूळ नाश झाला नाही. लागोपाठ तीन ऑपरेशन्स झाली आणि ती सुद्धा अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीतच.
 या प्रकारानंतर मामाना सांगलीत येऊन तब्बल एक वर्षाची विश्रांती घ्यावी लागली. जून १९५४ मध्ये पुन्हा येरे माझ्या मागल्या! पण या खेपेला पोटदुखीचं गंभीर स्वरूप पाहून डॉ. फडकेनी त्याना के. ई. एम् हॉस्पिटलमध्ये अॅडमिट् केले. तब्बल पाच महिने मामा बेडवर पडून होते.
 हा आजाराचा एकंदर प्रकार बघून, शंकर घाणेकरांचं वर्णन, “मामा नेहमी थिअटरमध्ये, नाटकाच्या किंवा हॉस्पिटलच्या,” किती यथार्थ वाटतं!

 सांगलीच्या विश्रांतीच्या काळात, मामानी मो. ग. रांगणेकरांच्या 'कुबेर'


सांगली आणि सांगलीकर.................................................................... १४९