पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तर स्वाभिमानाचा राजमुकुटच आहे."
 थोडंसं आर्थिक स्थैर्य आलं. नाट्यव्यवसाय मामानी सोडला खरा पण अंत:करणातील नाट्याभिनयाची भूर्मी त्याना गप्प बसू देत ना! नूतन पेंढारकरांच्या आग्रहामुळे, बापूराव पेंढारकरांच्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या 'हाच मुलाचा बाप' या नाटकात त्यानी रावबहाद्दुराची भूमिका, काही बिदागी न घेता हौसेखातर केली. परळच्या दामोदर हॉलला नाटक झाल्यानं आणि कामगार मंडळीत बापूरावांविषयी आदर असल्यानं, मामांना कामगार रंगभूमीवरील नाटकांतून कामे करण्याची तशीच दिग्दर्शनाची आमंत्रणे येऊ लागली.
 आता नाट्य-व्यवसायावर पोट अवलंबून नव्हतं! गरज नव्हती तरी मामांना नाटकातील कामे मिळू लागली. दिग्दर्शनासाठी विचारणा होऊ लागली. मामा मनातल्या मनात म्हणाले असतील "कालाय तस्मै नमः ! "
 त्या काळात मामांची तारांबळ अडत असे. नाटकाच्या तालमी संध्याकाळी गिरगावात घ्यायच्या. रात्री-अपरात्री गोरेगावला तबेल्यात जायचे. दूध काढायचे. ते काम रात्री १-१।। पर्यंत चाले. सकाळचे अकाडे झाले की जेवायला घरी. म्हशींची अस्तवार. नाटकांच्या तालमी. अशा धावपळीत मामा दमून जायचे. तरीपण हौस वाटायची. चरितार्थ चाले आणि छंद पण जोपासता येई.
 हा सर्व व्याप चालू असतानाच भालचंद्र पेंढारकर मामाना भेटले. ते 'ललितकलादर्श' पुन्हा सुरु करत होते. त्यानी मामाना आग्रहाने आमंत्रण दिले. पूर्वीच्या 'अनुभवांवरुन' मामानी सावधपणे सांगितले की “मी चरितार्थासाठी दुधाचा धंदा सुरु केला आहे. तो संभाळून शक्य ती मदत करेन." या सुमारास (१९४१ नंतर अत्रे, वरेरकर रांगणेकर यांच्या प्रयत्नाने) नाट्य-व्यवसायाला पुन्हा चांगले दिवस येऊ लागले होते. ललितकलादर्शच्या सत्तेचे गुलाम'मध्ये मामा, हेरंबरावाची भूमिका करीत; खेरीज नानासाहेब फाटक नसतील तेव्हा नाटकाच्या तालमी घेत. हळूहळू 'ललितकलादर्श' च्या संचालनाची जबाबदारी मामांकडे आली. भालचंद्र पेंढारकर लहान, अननुभवी असल्याने त्यांचे मेहुणे बाबूराव देसाई ( हे रिझर्व बँकेत मॅनेजर होते.) यानी मोठ्या विश्वासाने ही जबाबदारी मामांवर टाकली. याच काळात 'नाट्यनिकेतन' च्या (मो.ग. रांगणेकरांच्या) 'आशिर्वाद' आणि 'नंदनवन' या नाटकातही मामा कामे करीत.

 १९४४ च्या नोव्हेंबरमध्ये मुंबईत, मोठ्या प्रमाणावर रंगभूमीचा शतसांवत्सारिक अत्सव, मुंबई मराठी साहित्यसंघाचे अध्वर्यू डॉ. भालेराव यानी साजरा करावयाचे ठरविले. त्यासाठी 'भाऊबंदकीचा' मोठ्या दिमाखात प्रयोग करण्यात आला आणि


सांगली आणि सांगलीकर................................................................. .१४८