पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



मल्लविद्येचे द्रोणाचार्य
कै. हरि नाना पवार



 पृथ्वीराजकपूर म्हणजे जुन्या जमान्यातील चित्रपटसृष्टीतील मोठं, बडं प्रस्थ. राजकपूरचे हे पिताजी (आजच्या पिढीसाठी सांगायचं तर करिष्मा कपूरचे पणजोबा) अभिनयकुशल असे अभिनेते तर होतेच, पण आश्चर्य म्हणजे मोठे पहिलवान गडी होते. सदैव तालमीत घुमण्यात या बड्या नटाला आनंद वाटे. एकदा असेच आखाड्यात गेले होते, तेव्हा त्यांच्या एका दोस्ताने, त्यांची एका मल्लाशी ओळख करुन दिली. नव्या नव्या मल्लांशी दोन हात करण्यासाठी पृथ्वीराजांचे बाहू नेहमीच फुरफुरत असत. पण समोरचा मल्ल त्याना अगदीच किरकोळ वाटला. निदान अंगावरच्या कपड्यांवरुन तरी. पण कुस्तीला सुरुवात झाल्याबरोबर, काही क्षणांतच, त्या किरकोळ दिसणाऱ्या मल्लाने, पृथ्वीराजजीना, दाणकन खाली खेचले आणि चितपट केले. पृथ्वीराजजी अचंबित झाले. त्या मल्लाचा हात त्यानी कौतुकाने हातात घेतला. हातातील पकडीवरुनच आणि लोखंडी कांबीसारखा लवलवणाऱ्या शरीरावरुनच, त्याना त्या मल्लाच्या शरीर-सामर्थ्याची कल्पना आली. पण तेवढ्याने त्याला 'अजमावता' येणार नाही, म्हणून त्यानी आणखी आपल्या ओळखीच्या दोन तीन इराणी पैलवानांबरोबर, त्या मल्लाला झुंजायला लावलं. पाहता पाहता त्या तिन्ही इराणी पैलवानाना, त्या किरकोळ भासणाऱ्या मल्लाने अस्मान दाखवलं!
 आता आखाड्यात हरलोच आहोत, तेव्हा मुद्दाम इंग्रजीमध्ये बोलून त्याची जरा 'गंमत' करावी म्हणून पृथ्वीराजजीनी, इंग्रजीत त्याच्या कुस्ती - नैपुण्याची तारीफ केली आणि विचारलं. "What is your name? Where do you come from?”
 तेव्हा तो मल्ल पटकन् अत्तरला. “ I am Hari Nana Pawar from Sangli.”
 तेव्हा आणखीनच 'अडालेल्या' पृथ्वीराजजीनी मनापासून कौतुकानं म्हटलं,
“You are not Pawar. You are Power! '

 होय, त्या ‘पॉवरफुल' मल्लाचं नाव होतं हरि नाना पवार! हजार हजार जोर आणि दीड दीड हजार बैठका मारुन, वज्रदेही बनणारे, प्रतिस्पर्ध्याच्या अरात धडकी भरवणारे, अनेक नामवंत पैलवानांना चितपट करणारे, हरि नाना पवार हे कुस्तीक्षेत्रातील


सांगली आणि सांगलीकर.................................................................. .१२५