पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अभ्यास, तरुण रक्त यानी मला पाठीमागे ढकलण्यास सुरुवात केली.” त्यानंतर मोठ्या स्पर्धांमधील म्हैसकरांचा सहभाग अर्थात्च कमी झाला. होतकरू खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात त्यानी अर्वरित आयुष्य घालवले. अलीकडेच त्यांचे निधन झाले.
 आजच्या घडीला सांगलीचं नाव बुद्धिबळ क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुप्रतिष्ठित आहे ते भाऊसाहेब पडसलगीकर आणि त्यांचे सहकारी यांच्या अथक प्रयत्नांमुळे. म्हैसकरानी बुद्धिबळासाठी अशा तऱ्हेचे भरीव काम मात्र केले नाही. यात त्यांच्या काही अंगभूत स्वभावदोषाचा भाग होता.
 तरीपण या सांगलीकराने आपल्या गावाचं नाव बुद्धिबळाच्या क्षेत्रात थोडेसे परदेशात आणि बरेचसे अखिल भारतात दुमदुमत ठेवलं यात शंकाच नाही.

●●●

सांगली आणि सांगलीकर.................................................................. .१२४