पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गोष्टीचे मार्गदर्शन केले. सिटी हायस्कूलमधील त्यांच्या शिक्षक सहकाऱ्यानी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी साह्य केले. सिटी हायस्कूलच्या राजवाडा शाखेमध्ये, म्हैसकराना, श्री. के.जी. दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली रशियाला जाण्यासाठी थाटामाटात निरोप देण्यात आला. त्यांचा सत्कार करण्यात आला.
 आज परदेशगमनाचं कौतुक राहिलं नाही पण ४५-५० वर्षापूर्वी त्याची अपूर्वाई होती!
 काबूल- ताश्कंदमागे सप्रे, म्हैसकर वगैरेंची बुद्धिबळ टीम ३१ ऑगस्ट १९५६ रोजी मॉस्कोला पोचली. १ सप्टेंबरपासून सामने सुरु झाले. यजमान रशियासह एकूण ३४ राष्ट्र ऑलिंपिकसाठी मॉस्कोत जमली होती. जगातील नामवंत खेळाडू आले होते.
 पण दुर्दैवाने भारतीय टीमचा पूर्ण फज्जा अडाला.
 सांघिक खेळाच्या तंत्रात आणि आंतरराष्ट्रीय खेळातील स्पर्धांच्या अनुभवात भारतीय खेळाडू फारच कमी पडले. भारतीय खेळात नियोजन नव्हते. खेळ आणि खेळाडू यात अत्यावश्यक असा संवाद नव्हता. परिणामी पराभव अपरिहार्य होता.
 तरीपण वैयक्तिकपणे खुद्द म्हैसकरांचे चिली, आयर्लंड आणि फिनलंडच्या खेळाडूंबरोबरचे डाव चांगले झाले. फिनलंडविरुद्ध जिंकलेला त्यांचा डाव १२ वी चेस ऑलिंपियाड' या पुस्तकात छापून आला. म्हैसकरांच्या मते जिंकण्याची तीव्र अिच्छा भारतीय खेळाडूंमध्ये नव्हती. पराभूत मनोवृत्तीने त्यांचा खेळ झाला. आंतरराष्ट्रीय वातावरणाचा मानसिक दबाव होता. हा दबाव अितका होता की म्हैसकरांची रशियामधली पहिलीच लढत आईसलंडच्या 'मोलर' नावाच्या खेळाडूबरोबर झाली. नाव समजले तेव्हाच म्हैसकर मनोमन खचले. त्याना वाटले की बुद्धिबळात 'मोलर अॅटॅक' म्हणून हल्ला करण्याची पद्धती आहे, त्या मोलरचाच कुणी वंशज त्यांचा प्रतिस्पर्धी आहे. एवढा मानसिक दबाव !
 यानंतरही म्हैसकर भारतातील मॅचेसमध्ये खेळत राहिले. दिल्ली, हैद्राबाद, मुंबई, मद्रास येथील ऑल इंडिया चेस टूर्नामेंटस्, त्याचप्रमाणे इतर कमी अधिक महत्वाच्या स्पर्धांमधून ते खेळले. पुण्याची रानडे चेस टूर्नामेंट जी फक्त हिंदूंकरिताच होती, ती पुढे सर्वांसाठी खुली झाली, तेव्हा म्हैसकर त्यात पहिले आले.

 खुद्द म्हैसकरानीच लिहून ठेवलंय की हा विजय हा तसा स्पर्धांमधील असा शेवटचाच. त्यानंतर त्यांच्या खेळास अतरती कळा लागली. "नवीन कल्पना, पुस्तकी


सांगली आणि सांगलीकर................................................................. .१२३