पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आली की साधुदासानी सांगितल्याप्रमाणे, भुगाच चुकीच्या खेळ्या खेळत रहायचे. या भ्रामक खेळ्यांमुळे खरोखरच प्रतिपक्ष कधी कधी बुचकळ्यात पडे आणि डाव बरोबरीत सुटे. पण पहिल्या राष्ट्रीय स्पर्धांतून खेळताना म्हैसकराना आपल्या नेहमीच्या खेळांमधील अणिवांची प्रकर्षाने जाणीव झाली हा या राष्ट्रीय स्पर्धांचा मोठाच फायदा झाला. म्हैसकरानी पुस्तके काढून चिंतन केले.
 या चिंतनाची आवश्यकता होतीच होती.
 कारण म्हैसकरांच्या हातावर रेषा अमटत होती ती परदेशगमनाची. १९५६ च्या ऑगस्टमध्ये रशियात चेस ऑलिंपिक भरायचं होतं. मग त्यासाठी भारतातर्फे खेळणाऱ्या खेळाडूंची निवड कशी करायची, यासाठी डॉ. जोसेफ स्टाईन या नामवंत बुद्धिबळपटूने अहमदाबाद येथे 'इन्व्हिटेशन टूर्नामेंटस्' भरविल्या. या स्पर्धेत जे स्पर्धक पहिल्या चार क्रमांकात येतील त्याना मॉस्को ऑलिंपिकला पाठवण्याचे ऑल इंडिया चेस फेडरेशनने मान्य केले होते. म्हणजे एका अर्थी अहमदाबाद येथे होणाऱ्या मॅचेस या 'सिलेक्शन' मॅचेसच होत्या. रामदास गुप्ता, अलूरकर, सप्रे, वैंकय्या, जी. एस. दीक्षित असे अनेक चॅपिअन्स अहमदाबादेस जमले होते. म्हैसकरानी पहिल्याच सामन्यात आंध्र प्रदेशच्या दीक्षितवर तुफानी हल्ला चढविला आणि एलुरुला त्याच्याकडून झालेल्या पराभवाचे भुट्टे काढले. नंतर चुरशीचा राउंड अलुरकर यांजबरोबर झाला. तो त्यानी टॉप क्वीन एंडिंग खेळून जिंकला. केरळच्या राजारामकडून त्याना हार पत्करावी लागली तरी एकूण स्पर्धेत म्हैसकराना चौथा क्रमांक मिळाला.
 म्हणजे रशिया ऑलिंपिक निश्चित झालं !
भारताची टीम म्हणून दर्भवैकय्या, आर. बी. सप्रे, रामदास गुप्ता आणि म्हैसकर अशी चारजणांची टीम अहमदाबादच्या सिलेक्शनप्रमाणे जायची होती. रशियन हद्दीत पोचल्यापासूनचा या भारतीय टीमचा सर्व खर्च रशियन सरकार करणार होते. तिथंपर्यंत जाण्यायेण्याचा खर्च मात्र प्रत्येक खेळाडूला स्वतःच्या पैशातूनच करावा लागणार होता.
 म्हैसकराना हे समजल्यावर थोडा धक्काच बसला. बुद्धिबळाचं ठीक आहे पण 'अर्थबळाचं' काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर अभा ठाकला!

 सांगलीचे 'गुणी जनांचे आधारु' श्रीमंत चिंतामणराव अप्पासाहेब आणि अन्य सांगलीकरांनी मदतीचा हात पुढे केला. म्हैसकरांचे वर्गमित्र सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ श्री. जे. पी. नाईक आणि चित्रा नाईक यानी परदेशात वागावं कसं, अिथंपासून सर्व


सांगली आणि सांगलीकर.................................................................. १२२