पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पिछाडीस जाऊन त्यांचे प्यादे मुक्त होऊ दिले नाही व प्रोफेसराना (अलूरकराना) माझ्या प्याद्यास हत्ती द्यावा लागला व मी डाव जिंकला. प्रोफेसरानी रिझाईन केल्याबरोबर मी अठलो आणि वडिलांच्या अंगावर अक्षरशः अडी मारुन त्यांच्या गळ्याला मिठी मारली. सावत्र बंधू शंकरदादा सर्व पहायला होतेच. बाबानी 'फार नाचू नको. शांत रहा” असे सांगितले...माझ्या खेळाने बुद्धिबळक्षेत्रात एकच धमाल झुडाली. दुसरे दिवशी साधुदासानी रस्त्यात चुन्याने लिहवून घेतले, "गज गोष्पदी बुडाला. "

 या स्पर्धेत म्हैसकराना बक्षिस मिळाले नाही. पण त्यांच्या खेळाचा दर्जा वाढला. दबदबा वाढला, मुख्य म्हणजे त्या दिवसापासून त्याना सीनिअर खेळाडूंमध्ये प्रवेश मिळाला. कोणत्याहि स्पर्धेतील त्यांचा प्रवेश सुकर झाला.
 त्यापेक्षाहि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याना स्वतःची 'ओळख' मिळाली!
 त्यानंतर जमेल त्या स्पर्धांतून भाग घेण्याचा त्यानी सपाटा लावला. सांगलीचे 'साधुदास' काही काळ तत्कालीन सांगली संस्थानच्या सरकारी छापखान्याचे मुख्य होते. `त्या अधिकारात ते ब्रिटीश चेस मॅगेझिन्स मागवत. त्यामध्ये नामांकित खेळाडूंचे गाजलेले डाव दिले जात. म्हैसकर त्या डावांचा अभ्यास करत, त्याचे चिंतन करत. काही डाव वहीमध्ये अतरुन घेत. कारण एक तर अशी पुस्तके, मॅगेझिन्स दुर्मिळ असत आणि दुसरे म्हणजे विकत घेण्याची ऐपत नसे. मात्र म्हैसकराना सांगलीत निष्णात खेळाडूंचे डाव नेहेमी पहावयास मिळत. लोकमान्य बुक डेपोचे दीक्षित किंवा विष्णुपंत राजवाडे यांच्या चिंतामणी प्रेसमध्ये, सीनिअर खेळाडूंच्या बैठका होत. त्यांच्या खेळांचा अभ्यास करता येई.
 सांगलीत २४ डिसेंबर १९३३ ते २ जानेवारी १९३४ च्या दरम्यान विष्णुपंत राजवाडे यानी बुद्धिबळ स्पर्धा भरविल्या. म्हैसकराना अर्थात् आमंत्रण होतेच. पण त्याना ११ पैकी फक्त अडीच गुण मिळाले. फक्त विनायकराव खाडिलकर यांच्यासारख्या प्रथितयश खेळाडूवर 'डबल रुक एंडिंग' ने डाव करता आला एवढीच कमाई !

 १९४१ मध्ये म्हैसकराना पुण्याला "कॅप्टन रानडे चेस टूर्नामेंट्स” जाहीर झाल्या होत्या, त्यात भाग घ्यायची संधी मिळाली. या संधीचे मात्र म्हैसकरानी सोने केले. आपला आजवरचा अभ्यास त्यानी पणाला लावला. कर्जत, मुंबई, पुणे, सांगली अशा ठिकाणांहून आलेल्या मोठमोठ्या खेळाडूंचा पराभव करत स्पर्धेत त्यानी दुसरा क्रमांक पटकावला. रु. १२५/- चे त्याकाळचे घसघशीत बक्षिस मिळवले. खरं तर पहिल्या नंबरचाच मान मिळायचा. पण 'साधुदास' अर्फ गोपाळराव मुजुमदारांवर,


सांगली आणि सांगलीकर............................................................ १२०