पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पण मातब्बर- सीनिअर खेळाडुंमध्ये खेळण्याचा योग मात्र अचानक आला.
 १९२९ च्या मे महिन्यात सांगलीच्या देवल क्लबने बुद्धिबळ सामने आयोजित केले होते. अर्थातच सीनिअर खेळांडूसाठी. त्यात तरुण म्हैसकरांना अचानक प्रवेश मिळाला. स्पर्धेसाठी बाबा बोडस, पुण्याचे प्रो. अलूरकर, साधुदास असे सीनिअर खेळाडू होते. एकूण ११ खेळाडू झाले. फेरी पूर्ण होण्यासाठी आणखी एकाची आवश्यकता होती. म्हैसकरांचे वडील खेळणार होतेच. त्याना आपल्या मुलाचा खेळ माहीत होता. त्यानी आयोजकाना आग्रह करुन तरुण म्हैसकराना स्पर्धेत प्रवेश मिळवून दिला.
 या सुवर्णसंधीचा म्हैसकराना भविष्यकाळात फारच अपयोग झाला.
 त्यांची पहिलीच फेरी साधुदासांबरोबर झाली. तरुण म्हैसकर जिद्दीने खेळत होते. सामना बरोबरीत सुटणार असा चुरशीत चालला असतानाच, म्हैसकरानी एक चूक केली. नेहेमीच्या त्याच त्याच पारंपारिक खेळ्या करण्याऐवजी, एकदम जिंकायच्या दृष्टीने त्यांनी चाली रचल्या. त्या त्यांच्याच अंगाशी आल्या आणि घोड्यांच्या अखेरीत ते हरले. पण साधुदासांना तरुण म्हैसकरांच्या खेळाचा दर्जा आणि आवाका कळून चुकला. ते अितरांना म्हणाले “विंचवाचं पिल्लू आहे. सांभाळा रे." मग बाबा बोडस म्हणाले, "अजून अनुभवशास्त्र माहीत नाही. "
 त्या स्पर्धेतील दुसरे, तिसरे राउंडस बाळशास्त्री फाटक आणि के.आर.हौसिंग यांच्याबरोबर होते. ते म्हैसकरानी जिंकले. पुढचा राअंड चक्क खुद्द त्यांच्या वडिलांबरोबर झाला. त्यात म्हैसकर हरले. पाचवा राउंड नामांकित खेळाडू प्रो. अलुरकर यांच्या बरोबर झाला. मोठा चुरशीचा खेळ झाला. म्हैसकरानी कमाल केली. प्रो. अलूरकरांवर मात करुन जाणकार मंडळींमध्ये खळबळ अडवून दिली. त्याचे वर्णन खुद्द म्हैसकरानी स्वतःच्या आत्मचरित्रात केले आहे. ते असे.

 "माझा पाचवा राअंड प्रो. अलुरकर याजबरोबर झाला. मी कॅसल केले नाही. ॲटॅक लावला. पण एक चूक राहिली आणि लहान मोठे गेले. पुन्हा मी एक घोडे प्याद्याखाली टाकले व अजव्या कडेच्या पट्टीत वजीर हत्ती जुळवून त्यांच्या (अलूरकरांच्या) राजाला हैराण करुन सबंध हत्ती परत मिळवला. लोक कौतुकाने बघत होते. भाल्या म्हैसकरने प्याद्याखाली घोडे कसे टाकले आहे, ते पहायला म्हणून बाबा बोडसानी, जुने पट्टीचे खेळाडू अण्णा गद्रे याना शेजारच्या खोलीतून बोलावून आणले. डावात वजिरा वजिरी होऊन हत्ती, पाच पाच प्यादी अशी अखेरी अरली. माझा राजा पुढारलेला मुक्त प्यादे घेऊन सरु लागला व माझ्या हत्तीने


सांगली आणि सांगलीकर.............................................................. ११९