पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वृत्तपत्रात या कवितेला ठळकपणे प्रसिद्धी मिळाल्याने ती कविता फार गाजली. आणि "हे डाळिंबाचे दाणे वेड्या, घात तुझा करिती" या काव्यपंक्ती सर्वतोमुखी झाल्या. अर्थात् अपेक्षेप्रमाणे ही प्रसिध्दिी राजेसाहेबांच्या कानी जाऊन, काव्यविहारीना खुलासा विचारला गेला. तेव्हा "ब्रिटिशानी विचारलं तर अत्तर देण्यास मी समर्थ आहे. फार तर त्यावेळी तुम्ही मला संरक्षण देऊ नका म्हणजे झालं" असं तडाखेबंद अत्तर काव्यविहारीनी दिलं! ब्रिटिशांची अवकृपेची तशी वेळ आली नाही. याचं एक कारण म्हणजे शब्दात न सापडण्याचं कायद्याचं ज्ञान त्याना अपयोगी पडलं असावं.
 स्वातंत्र्याच्या चळवळीचा तो काळ होता. अनेक लढे, आंदोलने, सत्याग्रह यांची सर्वत्र धामधूम माजली होती. काव्यविहारींच्या अनेक कवितांमधून त्यांचे स्वदेशप्रेम व्यक्त होत होते. १९४२च्या आंदोलनात, काँग्रेसच्या बुलेटिन्समध्ये, त्यांच्या अनेक कविता अद्धृत केल्या जात. अशा कवितांची अदाहरणे विस्तारभयास्तव देता येत नाहीत. तरीपण त्यांच्या 'पायरीवर' या कवितेचा अल्लेख केलाच पाहिजे. क्रांतिप्रवण स्वातंत्र्यसैनिकाच्या भूमिकेशी जुळणारी, त्यांच्या मनाची सहसंवेदना, त्यामध्ये व्यक्त झाली आहे.

"किती वेळ तिष्ठतो येथे
अजुनि का बंद ते द्वार"

 अशी सुरुवात असणाऱ्या त्या कवितेच्या शेवटच्या ओळी पुढीलप्रमाणे आहेत.

“बंद जे द्वार हे पुढचे
आंतुनि न अघडायाचे
करुनिया यत्न निकराचे"
आम्हीच पुढुनि 'फोडावे', तेधवा खुले होणार !”

 यातील 'फोडावे' या शब्दाऐवजी 'खोलावे' असा सौम्य शब्द ठेवावा, असा एक विचार होता. पण 'फोडावे' हा शब्दच जोरकस आणि अर्थवाही असल्याने तोच ठेवावा, असा काव्यविहारी व ती कविता प्रसिद्ध करणारे 'किर्लोस्कर' चे धाडशी आणि धडाडीचे संपादक श्री. शंकरराव किर्लोस्कर यांचा निश्चय झाला. संभाव्य परिणामांची पूर्ण जाणीव ठेवून शं. वा. कि. एवढ्यावर थांबले नाहीत तर कवितेसोबत त्यानी एक चित्र काढले. एका मोठ्या कुलुप लावलेल्या दरवाज्यासमोर एक खेडूत हातात भला थोरला हातोडा घेऊन, हात अगारून म्हणत आहे, "व्हाईसराया, दार अघडणार की नाही?” अशा आशयाचे ते व्यंगचित्र त्यानी स्वतःच काढले! सांगलीच्या दुसऱ्या सुपुत्राने म्हणजे वसंतदादांनी, या कवितेच्या प्रसिद्धीनंतर काही महिन्यातच तुरुंग फोडून पळण्याचा प्रयत्न केला होता ! ही घटना बोलकी आहे. कवितेचा प्रभाव
सांगली आणि सांगलीकर................................................................... ११३