पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



राहिली !
 त्यानी सोने, नाणे, पैसा-अडका याचा यत्किंचितहि विचार न करता शब्दकोशाची मुद्रणप्रत आधी पागोट्यात बांधली आणि पुराच्या पाण्यातून पोहून जात 'केसरीचा' गायकवाडवाडा गाठला आणि मुद्रणप्रत प्रलयातून वाचवली.
 केवढी ही विलक्षण संगीतनिष्ठा!
 आजहि ही मुद्रणप्रत मायक्रोफिल्मच्या रुपात दिल्लीच्या संगीतनाट्य- ॲकाडमीमध्ये जतन करुन ठेवलेली आहे.
 या पराक्रमानंतर मात्र त्यांचे प्रकृतीस्वास्थ्य गेले. तोंडावर, पायावर, रक्त गोठून फोड येऊ लागले. त्यानंतरहि त्यांचे लेखन-वाचन चालूच होते पण त्यात पूर्वीचा जोष अरला नव्हता. १९६५ मध्ये त्याना संगीत, नाट्य, अॅकेडमीची फेलोशिप भारत सरकारने दिली. त्यांच्या आजवरच्या संगीतसेवेचा हा मोठाच गौरव होता. २३ डिसेंबर १९६५ रोजी श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते, दिल्लीमध्ये, 'रत्नसदस्य' हा किताब रानड्याना देण्यात आला.
 पण दिल्लीची कडाक्याची थंडी त्याना बाधली. तेथे थंडीने लघवी गोठण्याचा त्रास झाला. घाईघाईने विमानाने त्याना मुंबईत आणण्यात आले. प्रोस्टेट ग्लँडच्या ऑपरेशननंतर ते काही काळ ठीक होते. पुन्हा रक्त गोठण्याचा त्रास सुरु झाला. डॉ. ग्रँट हास्पिटलमध्ये ब्रेन थ्रॉयबॉसिससंबंधीचे ऑपरेशन झाले. पण अपयोग झाला नाही.
 १० मार्च १९६६ ला ग्रँट हॉस्पिटलमध्येच ६९ व्या वर्षी प्रो. रानडे यांचे निधन झाले.
 एका अर्थी एका संगीत साधनेचाच हा अंत झाला. संगीत क्षेत्रातील ज्ञानाचा, परिभाषेचा, शास्त्रशुद्ध तंत्राचा एवढा गाढा व्यासंग करणे याला मोठे बुद्धिवैभव आणि पराकोटीचे परिश्रम लागतात. प्रो. रानडे यानी तशी चिकाटी दाखवून, संगीतशास्राच्या अभ्यासकांवर मोठे अपकारच केले आहेत. त्यांची शास्त्रोक्त संगीतावर एवढी विलक्षण निष्ठा होती की गायक व आकाशवाणी यांच्यामध्ये जो झगडा, नभोवाणी मंत्री बाळकृष्ण केसकर यांच्या कारकिर्दीत झाला तो त्याना फार व्यथित करुन गेला. श्रवण कसोटी (Audition test) पास झाल्याशिवाय कलाकाराना आकाशवाणीवर कार्यक्रम मिळेनात आणि अशी आपली 'परीक्षा' घेतली जाणे ज्येष्ठ कलाकारांना अपमानास्पद वाटू लागले म्हणून त्यानी
सांगली आणि सांगलीकर................................................................... .१०५