पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांच्याच आग्रहावरुन रजिस्टर्ड करण्यासाठी रानडे यानी बरेच परिश्रम केले. १९४२ मध्ये ती संस्था 'भारतीय संगीत प्रसारक मंडळ' या नावाने रजिस्टर्ड झाली. संस्थेचे पहिले अध्यक्षपद दत्तो वामन पोतदार याना तर अपाध्यक्षपद प्रो. रानडे याना देण्यात आले.
 १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर शाळा-कॉलेजातून अत्तम प्रकारचे संगीत शिक्षण दिले जावे या कल्पनेतून तत्कालीन मुंबई राज्याचे प्रमुख, नामदार बाळासाहेब खेर, यानी एक म्युझिक एज्युकेशन कमिटी नेमली. या कमिटीचे मेंबर- सेक्रेटरी म्हणून प्रो.रानडे यांची नेमणूक झाली. प्रि. जठार अध्यक्ष होते. मा.कृष्णा, विनायकबुवा, बी. आर. देवधर इत्यादि संगीत क्षेत्रातील दिग्गज सभासद होते. मुंबई प्रांताच्या विविध भागातील शाळा-कॉलेजातून या सर्वानी दौरे केले व या अनुभवातून प्रो. रानडे यानी जो परिश्रमपूर्वक रिपोर्ट तयार केला तो सरकारने जसाच्या तसा स्वीकारला यातच त्यांचे यश होते.
 १९५० साली दिल्लीला संगीत नाटक अॅकेडमी स्थापन झाली. त्या अॅकेडमीच्या निरनिराळ्या चार-पाच कमिट्यांवर प्रो. रानडे यांची सल्लागार सदस्य म्हणून नेमणूक झाली. १९५५ साली मनिला (फिलिपाईन्स ) येथे झालेल्या South East Asiatic Conference मध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून अपस्थित राहण्याचा बहुमान त्याना मिळाला.
 १९५८ साली कॉलेजच्या नोकरीतून ते निवृत्त झाले.
 त्यानंतर तर एक मोठेच काम त्यांची वाट पहात होते! संगीत नाटक अॅकॅडमीने संगीताचा शब्दकोष तयार करण्याचे ठरवले होते. तेंव्हा १९५९ झाली त्यानी प्रो. रानडे याना Encyclopedia of Indian Music लिहिण्यासाठी पाचारण केले. त्यानी आनंदाने हे आवडीचे काम करण्यास संमती दिली. त्यानी मोठ्या जिद्दीने या कामाला सुरवात केली. त्यामध्ये भारतीय संगीताचा अितिहास, या संगीतशास्त्राची वैशिष्टये, भारतीय संगीत पाश्चात्य संगीतापेक्षा कसे वेगळे आहे, ते कंटाळवाणे (Monotonous) का होत नाही याचा अहापोह केलेला आहे. १९६१ च्या जून मध्ये हे काम जवळजवळ पूर्ण झाले व त्याची मुद्रणप्रत तयार झाली.
 आणि एक वेगळेच संकट अभे राहिले!

 १२ जुलै १९६१ ला पुण्यात पानशेतचा जलप्रलय झाला. प्रो. रानडे यांचे पुण्यातील घर अगदी मुठा नदीच्या काठीच होते. घरात पाणी शिरले. या प्रसंगी त्यांची संगीतावरची भक्ती, तुकारामाच्या अभंगासारखी पाण्यावर निश्चलपणे तरंगत


सांगली आणि सांगलीकर........................................................................ १०४