पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 असाच एक दिवस, ८-१० वर्षांचा एक मुलगा एका कानडी गृहस्थांसमवेत आला होता. "मुलगा पेटी छान वाजवतो, त्याला गाणे शिकायचे आहे" असे तो कानडी गृहस्थ सांगू लागला म्हणून त्या मुलाचा रानड्यानी घरी कार्यक्रम केला. त्याचे कौतुक म्हणून त्याला जरीची टोपी दिली. प्रो. रानडे यानी त्या मुलाला गणे शिकण्यासाठी प्रो.बी.आर. देवधर यांचे नाव सुचवले. हा मुलगा म्हणजे पुढे सर्वाना वेड लावणारा जगद्विख्यात गायक कुमार गंधर्व !
 कॉलेज-व्यतिरिक्त मोकळया काळात प्रो. रानडे यांचे संगीतविषयक वाचन व चिंतन जोरात सुरु झाले. संगीत कलेचे त्यानी विधिवत् शिक्षण घेतलेले असल्यामुळे शब्द-माध्यमातून, या श्रेष्ठ कलेची अकल करुन दाखवावी असा त्यांचा प्रयत्न होता. त्याचबरोबर विशेष अभ्यासकांसाठी व कलावंतांसाठीसुद्धा एखाद्या विवेचनात्मक ग्रंथाची गरज भासत होती; तसे अनेकांच्या बोलण्यातून जाणवत होते. या विचारमंथनातूनच प्रो. रानडे यानी १९३३ साली 'संगीताचे आत्मचरित्र अथवा सुशिक्षितांचे संगीत' हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात संगीताचे तात्त्विक स्थित्यंतर, स्वर-विचार व रागरचनातत्व, वर्णोच्चार, भावना - विलास, सौंदर्योत्कर्ष अशा तात्विक गोष्टींचा सविस्तर अहापोह केलेला आहे. स्वतः फिजिक्सचे प्राध्यापक असल्याने, अत्यंत चिकित्सक दृष्टया त्यांचे लेखन झाले आहे, जे आजच्या काळातसुद्धा, अभ्यासकाना अपयुक्त आहे. विशेषतः संगीत कसे ऐकावे याबाबतचे त्यांचे विचार आजच्या सामान्य रसिकानी मुळातून 'वाचावेत एवढे बोधप्रद आहेत.
 १९३८ साली प्रो. रानडे यानी Hindusthani Music - Its Physics and Aesthetics हे पुस्तक इंग्रजीत लिहिले. पुस्तक जाणकार रसिकाना एवढे भावले की त्या पुस्तकाच्या आजवर चार आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. ह्या पुस्तकाचा आणखी एक विशेष म्हणजे, भारतापेक्षा परदेशात या पुस्तकाची विक्री आणि बोलबाला अधिक झाला. पुढे त्यानी Music of Maharashtra हे पण पुस्तक लिहिले. तथापि त्यांचे काही अभ्यासपूर्ण लेख अप्रकाशित स्वरुपातच राहिले.

 कोणतेहि लेखन करताना प्रो. रानडे, त्या लिखाणाच्या सत्यतेविषयी अत्यंत जागरुक असत. गोविंदराव टेंबे, ना.सी. फडके, प्रो. बी. आर. देवधर, प्रि. जठार आदी मान्यवरांना दाखवून स्वतःचे लेखन सुधारुन घेत. एकदा तर 'तंबोऱ्याची मिलावट' (इंग्रजी पुस्तकातील 'ड्रोन') हा लेख त्याना लिहायचा होता. दोन दोन


सांगली आणि सांगलीकर...................................................................... १०२